आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rafael Nadal, Roger Federer, Maria Sharapova And Serena Williams All Safely Through On Day Two

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नदाल, सेरेनाची आगेकुच, सोमदेव पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - स्पेनचा राफेल नदाल आणि अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विलियम्सने विम्बलडन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. तर, भारताची एकमेव आशा असलेल्या सोमदेव देवबर्मनला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. सोबतच स्वित्झर्लंडचा रॉजर फेडर, रशियाची स्टार मारिया शारापोव्हा आणि अँग्न्स्जिका रंदरवास्कानेही पहिल्याफेरीच्या लढतीत विजय मिळवला आहे.

दुसरे मानांकनप्राप्त खेळाडू राफेल नदालने स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिजनला 4-6, 6-3, 6-3, 6-3 अशा सेटमध्ये पराभूत केले. अन्य एका लढतीत स्टार खेळाडू रॉजर फेडररने इटलीच्या पावलो लोरेंजीला 6-1, 6-1, 6-3 अशा फरकाने हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत फ्रान्सचा विल्फ्रेड सोंगा, स्वित्झर्लंडचा स्टांसिलास वावरिंका, कॅनडाचा मिलोस राओनिक, ऑस्ट्रेलियाचा लेटन हेविट, अमेरिकेचा जॉन इस्नर, जपानचा केई निशीकोरी, स्पेनचा फेलिसीयाने लोपेज, फ्रान्सचा रिचर्ड गास्केट, गेल मोंफिल्स आणि ज्यूलियन बेनेट्यू यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यांवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या सोमदेव देवबर्मनला 3 तास 4 मिनिटांपर्यंत चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत पोलँडच्या जेर्जी जानोव्हिजकडून पराभूत व्हावे लागले. जानोव्हिजने सोमदेवला 4-6, 6-3, 6-3, 3-6, 6-3 अशा सेटमध्ये पराभूत केले.

महिला गटात अव्वल टेनिसपटू सेरेना विलियम्सने अमेरिकेच्या अँना ताताशिवली हिला 6-1, 6-2 अशाप्रकारे थेट सेटमध्ये पराभूत केले. शारापोव्हाने ब्रिटनच्या सामंथा मरे हिला 6-1, 6-0 ने तर रंदवास्काने आंद्रिआ मितुला 6-2, 6-1 ने मात देत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

व्हीनसची विजयी सलामी
जगातील माजी नंबर वन महिला खेळाडू व्हीनस विल्यम्सने महिला एकेरीत विजयी सलामी दिली. तिने स्पेनच्या एम. टोरो-फ्लोरचा पराभव केला. अमेरिकेच्या खेळाडूने 6-4, 4-6, 2-6 अशा फरकाने रोमांचक विजय मिळवला.

डेव्हिड फेरर दुसर्‍या फेरीत
सातव्या मानांकित डेव्हिड फेररने पुरु ष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. त्याने स्पेनच्या पी. कॅरेनो बुस्टाला धूळ चारली. स्पेनच्या फेररने 6-0, 6-7, 6-1, 6-1 अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला. बिगरमानांकित बुस्टाने फेररला रोखण्यासाठी दिलेली झुंज व्यर्थ ठरली.
विम्बलडन टेनिस स्पर्धा : मारिया शारापोव्हासुद्धा विजयी