आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahane And Ashwin In Fray To Become Kohlis Deputy, Latest News In Marathi

कोण होणार भारतीय क्रिकेट संघाचा उप-कर्णधार? रहाणे-अश्विनमध्‍ये स्‍पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न कसोटीनंतर धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्‍ती घेतली. तेव्‍हा कर्णधार पदाची धुरा विराट कोहलीकडे आली. मात्र, कोहलीच्‍या जागी कोणत्‍या खेळाडूची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी सांगितल्‍यानुसार, उपकर्णधारासाठी अजिंक्‍य रहाणे आणि आर.अश्विनची वर्णी लागू शकते.

''निवड समिती आणि संघ व्‍यवस्‍थापक रवी शास्त्री कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून रहाणे आणि अश्विन यांना संधीची शक्‍यता असल्‍याचे बीसीसीआयच्‍या एका अधिका-याने सांगितले आहे.

रहाणेने आतापर्यंत 13 कसोटी सामन्‍यात 1026 धावा केल्‍या आहेत. शिवाय कोहली आक्रमक आहे, तर रहाणे शांत आहे. त्‍यामुळे रहाणेची वर्णी लागण्‍याची शक्‍यता जास्‍त असल्‍याचे बोलले जात आहे.
अनुभवाचा निकष घेतल्‍यास अश्विन रहाणेपेक्षा वरचढ ठरतो. त्‍याने 23 कसोटी सामने खेळले असून त्‍यामध्‍ये 114 विकेट आणि 956 धावा केल्‍या आहेत.