आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रहाणे परिस्थितीनुरूप खेळतो : प्रवीण अामरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकदिवसीय क्रिकेटच्या ढाच्यातून बाहेर पडून भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशात एका कसोटीसाठी निघालाय. अर्थातच प्रत्येक जण आपापली आयुधे आजमावून, तपासून पाहण्यात मग्न आहे. भारतीय क्रिकेट संघाचा भावी द्रविड म्हणून ज्याच्याकडे सध्या आशेने पाहिले जात आहे, त्या अजिंक्य रहाणेनेही कसोटीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली. अजिंक्यने आपले मार्गदर्शक, गुरू आणि ‘मेंटॉर’ अशा भूमिकेत सतत मार्गदर्शन करणारे भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण अामरे यांच्याशी अलीकडे सल्लामसलत केली. वांद्र्याच्या एमसीए इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रावर अामरेंसोबत सराव केला. आपल्या गुरूंकडून चार नव्या गोष्टी शिकून घेतल्या.

या वेळी नवे काय शिकवले? या प्रश्नावर प्रवीण अामरे म्हणाले, ‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपासून अगदी कालपरवा आयपीएलपर्यंत सर्व भारतीय खेळाडू मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत आहेत. कसोटी क्रिकेट हे या क्रिकेटपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे आम्ही दीर्घ काळ खेळपट्टीवर राहायचे आहे हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून सराव केला.

अजिंक्यला मी प्रथम सांगितले, बांगलादेश हा तू केलेल्या अन्य देशांच्या दौ-यांपेक्षा वेगळा देश आहे. तेथील हवामान आपल्याप्रमाणे असले, तरीही खेळपट्ट्या अतिशय संथ आहेत. चेंडू थांबून येतो. खाली वाकून सतत खेळावे लागते. त्यामुळे या परिस्थितीत खेळायचा सराव, तंदुरुस्तीसाठीचा, फिटनेसचा सराव हवा आहे. अजिंक्यकडून तो सराव करून घेतला, असे प्रवीण अामरे म्हणत होते.

आज्ञाधारक अजिंक्य
अजिंक्य आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखा आहे. त्याला सांगाल ते सर्व काही करतो. त्याची आकलनशक्ती चांगली आहे. एखादी गोष्ट सांगितली की तो ताबडतोब अनुकरण करतो, असेही आमरे म्हणाले.

प्रत्येकाची समस्या भिन्न
‘प्रत्येकाची समस्या वेगळी असते. अजिंक्य परिपूर्ण फलंदाज आहे. मात्र, छोट्या चुका त्रयस्थालाच त्याची फलंदाजी जवळून पाहिल्यानंतर कळू शकतात, त्या पाहून मी मार्गदर्शन करतो. रैनाची समस्या वेगळी होती, उथप्पाची वेगळी होती, असे आमरे म्हणाले.