आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राही सरनोबतचा एक कोटीचा धनादेश देऊन गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिण कोरियातील जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या राही सरनोबतचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एक कोटी रुपयांचा धनादेश देऊन आज गौरव करण्यात आला. या वेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महिला व बाल विकासमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच राही सरनोबतचे आई-वडील उपस्थित होते. या वेळी सर्वच मान्यवरांनी राही सरनोबतला भावी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


पुण्यात आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा
पुणे येथे 20 वी आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असून 3 ते 7 जुलै या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी 18 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ही स्पर्धा सुरुवातीला तामिळनाडू येथे होणार होती. मात्र, तामिळनाडू सरकारने नकार दिल्यानंतर फेडरेशनने ही स्पर्धा महाराष्‍ट्रात आयोजित करण्याविषयी राज्य सरकारला विनंती केली होती. त्यानंतर या स्पर्धेबाबतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय क्रीडा सचिवांशीही चर्चा केली. राज्याने सर्वसमावेशक असे नवीन क्रीडा धोरण जाहीर केले असून खेळाच्या विकासाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.