आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Dravid Acknowledges Team Effort In Win Over Punjab

IPL: सांघिक प्रयत्‍नाने जिंकलो- राहुल द्रविड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा विजय आम्ही सांघिक प्रयत्नामुळे मिळवला, अशी प्रतिक्रिया राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केली. पंजाबला मात दिल्यानंतर तो बोलत होता. 125 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 6 गड्यांनी विजय मिळवला. ‘श्रीसंतने आम्हाला सुरुवातीला लवकर विकेट मिळवून दिल्या. चांदिलानेही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. इतर गोलंदाजांनीही चांगले प्रयत्न केले आणि आमचे क्षेत्ररक्षण उत्तम ठरले. आम्ही त्यांना 124 धावांवर रोखून यश मिळवले होते,’ असे द्रविड म्हणाला.

125 धावांचे लक्ष्य मोठे नव्हते. मात्र, या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता. वॉटसनने सुंदर खेळ केला आणि रहाणेने त्याला उत्तम साथ दिली, असेही द्रविडने नमूद केले.