आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Dravid Got Defeat In All Of His Final Appearances In Cricket

द्रविड ठरला कमनशीबी, सचिनसारखे नव्‍हते भाग्‍य; पराभवानेच झाली कारकिर्दीची अखेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटमधील 'देव' सचिन तेंडुलकर निवृत्त झाला. सचिनचे वानखेडे मैदानावरील अखेरचे बोल ऐकून तमाम चाहते भारावून गेले. लाखो चाहत्‍यांच्‍या डोळ्यात पाणी आले. सचिनने भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून त्‍याला सन्‍मानाने निवृत्ती घेता आली. सचिनचा हा यथेचित सन्‍मान करण्‍यात आला. परंतु, त्‍याचे एकेकाळचा सहकारी राहुल द्रविड याला मात्र ही संधी मिळाली नाही. द्रविडने निवृत्ती घेतली त्‍यावेळी त्‍याला सचिनप्रमाणे सन्‍मान मिळाला नाही. द्रविडनेही भारतीय क्रिकेटला खूप दिले आहे. भारतीय संघाची 'द वॉल' म्‍हणून द्रविड ओळखला जायचा. ही 'वॉल' भेदणे भल्‍या भल्‍यांना शक्‍य झाले नाही. राहुल द्रविडमुळे भारताला परदेशात अनेक विजय साकारता आले. सचिनच्‍या साथीने द्रविडही लढत होता. पाकिस्‍तानातील कसोटी मालिका असो किंवा ऑस्‍ट्रेलियातील खडतर संघर्ष. इंग्‍लंडमध्‍ये कडाक्‍याची थंडी असो किंवा न्‍यूझीलंडमधील बोचरे वारे, द्रविडने प्रत्‍येक ठिकाणी जबरदस्‍त कामगिरी केली आहे. सचिनएवढेच त्‍याचेही योगदान मोलाचे आहे. परंतु, सचिनच्‍या नावामागे द्रविडचे यश कायम झाकाळल्‍या गेले आहे. भारताकडून वन डे आणि कसोटी या दोन्‍ही प्रकारांमध्‍ये 10 हजारांपेक्षा अधिक धावा काढणारा तो सचिननंतर दुसरा फलंदाज आहे.

सौरव गांगुलीने 1999 च्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेत श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती. त्‍यावेळी द्रविडनेही 145 धावा ठोकल्‍या होत्‍या. परंतु, गांगुलीच्‍या खेळीपुढे द्रविडची खेळी झाकाळल्‍या गेली. या सामन्‍यात द्रविडने मुथैय्या मुरलीधरनला समोर सरसावत कव्‍हर्सवरुन अफलातून षटकार ठोकला होता. त्‍यानंतरच श्रीलंकेच्‍या गोलंदाजावर द्रविड आणि गांगुलीने हल्‍ला चढविला होता.

सचिन तेंडुलकरने न्‍युझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे नाबाद 186 धावांची खेळी केली होती. त्‍याही सामन्‍यात द्रविड दुस-या बाजुने उभा होता. त्‍याने 153 धावांची खेळी केली होती. परंतु, सचिनची खेळीच वरचढ ठरली.

निवृत्तीबाबतही द्रविड कमनशीबी ठरला. सचिनच्‍या कारकिर्दीतील प्रत्‍येक प्रकारच्‍या क्रिकेटमधील अखेरच्‍या सामन्‍यात त्‍याच्‍या संघाला विजय मिळाला. परंतु, द्रविडबाबत हे विपरित घडले आहे. द्रविडच्‍या वाट्याला पराभवच आला आहे. द्रविडच्‍या कारकिर्दीची अखेर पराभवानेच झाली.

जाणून घ्‍या कशी झाली द्रविडच्‍या कारकिर्दीची अखेर... क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...