नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार
राहुल द्रविड इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सत्रात राजस्थान रॉयल्स संघाचा मेंटर म्हणून कायम राहणार आहे. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर द्रविडने राजस्थान रॉयल्स संघात मेंटरची जबाबदारी सांभाळली होती. तो यापुढेसुद्धा ही जबाबदारी पार पाडेल, असे संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघू अय्यर यांनी सांगितले.
द्रविड पुढच्या सत्रातही मेंटर म्हणून आमच्या संघासोबत कायम राहणार आहे. तो इतर कामांतही प्रचंड व्यग्र असल्याची आम्हाला जाणीव आहे. असे असताना त्याने पुढच्या सत्रासाठी ही जबाबदारी सांभाळण्यास होकार दिल्याने आम्ही आनंदीत आहोत, असे अय्यर म्हणाले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालयानंतरसुद्धा द्रविड राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळत होता.