Home | Sports | Latest News | rahul dravid participate in mcc meeting

राहुल द्रविड 'एमसीसी'च्या बैठकीत सहभागी होणार

वृत्तसंस्था | Update - Jul 17, 2011, 04:48 PM IST

भारतीय संघातील फलंदाज लॉर्ड्स येथे १८ ते १९ जुलै रोजी होणा-या 'एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटी'च्या बैठकीत सहभागी होणार आहे.

  • rahul dravid participate in mcc meeting

    लंडन - भारतीय संघातील फलंदाज राहुल द्रविड लॉर्ड्स येथे १८ ते १९ जुलै रोजी होणा-या 'एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटी'च्या बैठकीत सहभागी होणार आहे. या बैठकीत द्रविडच्या सहभागामुळे भारतीयांसाठी प्रतिष्ठेचा क्षण असणार आहे.

    'एमसीसी'चे सध्याचे अध्यक्ष टोनी लेविस यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही शेवटची बैठक आहे. या बैठकीत सहभागी सदस्य 'अंपायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम'(यूडीआरएस), भ्रष्टाचार, व्यवस्थापन इत्यादी मुद्यांवर चर्चा होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून या पदावर असलेले लेविस यांचीजागा १ ऑक्टोंबरपासून माईक ब्रिअर्ली हे घेणार आहेत. क्रिकेटमधील महत्त्वाचा कसोटी प्रकाशझोतात खेळविण्याविषयी निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राहुल दविड गुलाबी चेंडूबाबत त्याचे अनुभव मांडणार आहे. 'यूडीआरएस' बाबत डेव्हिड रिचर्डसन अहवाल सादर करणार असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माजी पंच स्टीव्ह बकनर आपले मत मांडणार आहेत. क्रिकेटमधील भ्रष्टाचाराविषयीही चर्चा होणार आहे. भ्रष्टाचाराविषयी अभ्यास करण्यासाठी 'एमसीसी'तर्फे स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीचा अहवालही सादर करण्यात येणार आहे.
    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending