Home | Sports | Expert Comment | Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team

धोनी, युवराज सिंगबाबत आताच निर्णय घेण्याची गरज- राहुल द्रविड

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 22, 2017, 10:46 AM IST

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर ऋषभ, कुलदीप यांना अधिक संधी मिळाली पाहिजे

 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  धोनी आणि युवराजला आणखी किती काळ खेळवायचे याचा निर्णय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला याबाबत चर्चा करून घ्यावा लागेल.
  स्पोर्ट्स डेस्क- आयसीसी २०१९ विश्वचषकाच्या आधी भारतीय संघासाठी महेंद्रसिंग धोनी आणि युवराजसिंगचे पर्याय शोधावे लागतील. धोनी आणि युवराजला संघाबाहेर केले जावे, हे गरजेचे नाही. मात्र, विश्वचषकाच्या आधी निवड समितीच्या हातात आताच या दोघांचे पर्याय असले पाहिजेत, असे टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने म्हटले आहे.

  द्रविड म्हणाला, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. संघ व्यवस्थापनाला एक योग्य रोड मॅप तयार करावा लागेल. आगामी विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंची भूमिका असेल की संघाला उपस्थितीत नवी प्रतिभा तपासायची आहे. याबाबत निर्णय घ्यावा लागेल.
  मंडळाने वेस्ट इंडीज दौऱ्यावर मजबूत संघ पाठवला आहे. मात्र, या दौऱ्यात अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यासारख्या नव्या खेळाडूंसोबत प्रयोग केले पाहिजे. या नव्या खेळाडूंना आता संधी दिली नाही तर मग नंतर वेळ मिळणार नाही.' चौथ्या आणि पाचव्या क्रमाचा फलंदाज महत्त्वपूर्ण आहे. कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीत अतिरिक्त सहावा फलंदाज खेळवला. आपल्याकडे हार्दिक पंड्या चांगला खेळत आहे. मात्र, रवींद्र जडेजा आणि अश्विन फलंदाजीत अपयशी ठरले. सहावा फलंदाज केदार जाधव खेळला. कारण, चौथ्या, पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांवर धावांबाबत विश्वास नव्हता, असेही आगरकरने सांगितले.
  कुलदीपला अधिक संधी द्या -
  राहुल द्रविड आणि आगरकर म्हणाले, सामन्यादरम्यान मधल्या फळीत विकेट हव्या असतील तर मनगटाने गोलंदाजी करणारा खेळाडू हवा. असे फिरकीपटू सपाट खेळपट्यांवरही विकेट घेऊ शकतात. कुलदीप यादव यात सर्वोत्तम पर्याय आहे. त्याला अधिकाधिक संधी दिली पाहिजे.'
  धोनी, युवराजमुळे संघ असंतुलित- आगरकर
  माजी खेळाडू अजित आगरकरच्या मते महेंद्रसिंग धोनी आणि स्फोटक फलंदाज युवराजमुळे सध्याची टीम असंतुलित आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत धोनी, युवराजचे प्रदर्शन समाधानकारक असले तरीही या दोघांच्या उपस्थितीमुळे संघ संतुलन बिघडले आहे. संघ असंतुलित झाला आहे. कारण, काही संघांकडे सहाव्या क्रमांकासाठी अष्टपैलू आहेत. मात्र, भारताकडे केवळ फलंदाज आहेत, असे त्याने म्हटले. त्यामुळे या दोघांनी सरस खेळी करून आपली क्षमताही वेळोवेळी सिद्ध केली. याचा टीमला फायदा झाला.
  अमित मिश्रा अजूनही टीम इंडिया बाहेर का?
  २०१५ पासून आतापर्यंतचा टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू अमित मिश्रा अखेर किती दिवस दुर्लक्षित असेल ? याचे उत्तर कोणाकडेही नाही. आयसीसी वनडे क्रमवारीत भारताचे जे दोन गोलंदाज सर्वांत पुढे आहेत, त्यांना टीम इंडियात स्थान नाही. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल १६ व्या तर अमित मिश्रा १८ व्या क्रमांकावर आहेत. २०१५ विश्वचषकानंतर अमित मिश्राने सामन्यांत २२.७८ च्या सरासरीने १९ विकेट घेतल्या. पटेलने १७ सामन्यांत ३४.५७ च्या सरासरीने १९ विकेट घेतल्या. तर अश्विनने १२ सामन्यांत ४७.३० च्या सरासरीने १३ विकेट आणि जडेजाने १५ सामन्यांत ६१.५८ च्या सरासरीने १२ विकेट घेतल्या आहेत.
  पुढे स्लाईडद्वारे वाचा, काय म्हणणे आहे राहुल द्रविड आणि अजित आगरकरचे...

 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  आयसीसी २०१९ विश्वचषकाच्या आधी भारतीय संघासाठी महेंद्रसिंग धोनी आणि युवराजसिंगचे पर्याय शोधावे लागतील, असे द्रविडने म्हटले आहे.
 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  माजी खेळाडू अजित आगरकरच्या मते महेंद्रसिंग धोनी आणि स्फोटक फलंदाज युवराजमुळे सध्याची टीम असंतुलित आहे.
 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  पंड्या बनू शकतो टीम इंडियाचा आधारस्तंभ 
   
  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकविरुद्ध भारताचे एकेक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परत येत होते. त्या वेळी फक्त हार्दिक पंड्याने टीम इंडियाकडून झुंज दिली. त्याने अवघ्या ४३ चेंडूंत ७६ धावा ठोकल्या. पंड्या खेळत असताना त्याच्यात युवराजची लय दिसली. पंड्या अगदी सहजपणे बॅटने चेंडूला ठोकत होता. त्याने युवीप्रमाणे सहजपणे चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवले. दूरपर्यंत षटकार मारण्याची त्याची क्षमता महेंद्रसिंग धोनीसारखी दिसते. बडोद्याच्या या युवा खेळाडूत टीम इंडियाला एक मजबूत भविष्य दिसत आहे. 
   
  शानदार फिनिशर बनण्याची आहे क्षमता :
   
  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंड्याला खूप वेळ झालेला नाही. मात्र, त्याने आपली लोकप्रियता वाढवली आहे. धोनी आणि युवराज दोघांची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही अनुभवी मॅच फिनिशरच्या जागी पंड्यात भारताला भविष्य दिसत आहे. चेंडूच्या वेगाने आपण घाबरत नाही, हे पंड्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत सिद्ध केले. पंड्या गरजेनुसार मोठे फटके खेळू शकतो. धोनीची टीम इंडिया आता विराटची टीम इंडिया बनत आहे. यात पंड्या फिनिशरच्या भूमिकेत फिट बसतो. कोहलीला त्याच्यावर विश्वासही दिसतो.
 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  धोनी, युवराजमुळे संघ असंतुलित : आगरकर 
   
  माजी खेळाडू अजित आगरकरच्या मते महेंद्रसिंग धोनी आणि स्फोटक फलंदाज युवराजमुळे सध्याची टीम असंतुलित आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत धोनी, युवराजचे प्रदर्शन समाधानकारक असले तरीही या दोघांच्या उपस्थितीमुळे संघ संतुलन बिघडले आहे. संघ असंतुलित झाला आहे. कारण, काही संघांकडे सहाव्या क्रमांकासाठी अष्टपैलू आहेत. मात्र, भारताकडे केवळ फलंदाज आहेत, असे त्याने म्हटले. त्यामुळे या दोघांनी सरस खेळी करून आपली क्षमताही वेळोवेळी सिद्ध केली. याचा टीमला फायदा झाला. 
 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  कुलदीपला अधिक संधी द्या :
   
  राहुल द्रविड आणि आगरकर म्हणाले, सामन्यादरम्यान मधल्या फळीत विकेट हव्या असतील तर मनगटाने गोलंदाजी करणारा खेळाडू हवा. असे फिरकीपटू सपाट खेळपट्यांवरही विकेट घेऊ शकतात. कुलदीप यादव यात सर्वोत्तम पर्याय आहे. त्याला अधिकाधिक संधी दिली पाहिजे.'  
 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  २०१५ पासून आतापर्यंतचा टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू अमित मिश्रा अखेर किती दिवस दुर्लक्षित असेल ? याचे उत्तर कोणाकडेही नाही.
  २०१५ पासून आतापर्यंतचा टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू अमित मिश्रा अखेर किती दिवस दुर्लक्षित असेल ? याचे उत्तर कोणाकडेही नाही. आयसीसी वनडे क्रमवारीत भारताचे जे दोन गोलंदाज सर्वांत पुढे आहेत, त्यांना टीम इंडियात स्थान नाही. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल १६ व्या तर अमित मिश्रा १८ व्या क्रमांकावर आहेत.
 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  २०१५ विश्वचषकानंतर अमित मिश्राने सामन्यांत २२.७८ च्या सरासरीने १९ विकेट घेतल्या. पटेलने १७ सामन्यांत ३४.५७ च्या सरासरीने १९ विकेट घेतल्या. तर अश्विनने १२ सामन्यांत ४७.३० च्या सरासरीने १३ विकेट आणि जडेजाने १५ सामन्यांत ६१.५८ च्या सरासरीने १२ विकेट घेतल्या आहेत. 
 • Rahul Dravid Uncertain About Dhoni And Yuvraj Places In Indian Team
  रवींद्र जडेजा आणि अश्विन फलंदाजीत अपयशी ठरले. तसेच ते पाटा खेळपट्टीवर अधिक धावा देताना दिसत आहेत. या दोघांना ब्रेक थ्रूही मिळत नसल्याचे चित्र आहे. 

Trending