आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raina, Jadeja Involved In Heated Argument Over Dropped Catch

रैना-जडेजा मैदानात भिडले;पोर्ट ऑफ स्पेनमध्ये प्रेक्षकांसमोर तमाशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडीजविरुद्ध शुक्रवारी टीम इंडियाने विजय साजरा केला खरा; परंतु सामना सुरू असताना मैदानावर रवींद्र जडेजा व सुरेश रैना यांचे भांडण आनंदाला गालबोट लावून गेले. हा प्रकार प्रेक्षकांनी तर प्रत्यक्ष पाहिलाच, कॅमेर्‍यांनीही तो टिपला. नेतृत्व करणारा विराट कोहली आणि ईशांत शर्मा यांनी शेवटी भांडण सोडवले.

कारण काय : जडेजाच्या चेंडूवर रैनाकडून दोनदा झेल सुटला. 26 व्या षटकात दुसर्‍या स्लिपमध्ये व नंतर 32 व्या षटकात सुनील नरेनचा झेल असाच सुटला. यामुळे जडेजाचा पारा चढला. त्याच्याच चेंडूवर नववा गडी बाद होताच जल्लोष सुरू असताना रैनाने झेल सुटल्याबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न केला. यावरूनच दोघांत जुंपली. जडेजा काहीतरी बोलला व रैनाने थेट त्याची कॉलर पकडून खेचले. यावर जडेजाही भडकला. शेवटी कोहली आणि ईशांतला मध्यस्थी करावी लागली.