आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मशाळा- एकदिवसीय सामन्यात टीम इंडियामध्ये सध्या फिनिशरची उत्कृष्ठ भुमिका निभावत असलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला वरच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करण्यास कोणतीच अडचण नाही. उलट वरच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन चांगली फलंदाजी करून कसोटीत जागा मिळवण्याची आपल्याला संधी मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
मला जर संधी मिळाली तर मी शंभर टक्के माझे योगदान देईन. तसेच मला जास्तीचे षटकेही खेळता येतील. मी यापूर्वी पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा आनंद घेतलेला आहे, असे रैनाने इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. रैना एकदिवसीय टीमचा महत्वाचा हिस्सा असला तरी कसोटीमध्ये त्याला अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. कसोटीमध्ये त्याची सरासरी अवघी 30 इतकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.