आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Kundra And Shilpa Shetty In Problem For IPL Spot Fixing Case

राज कुंद्राची भागीदारी धोक्यात; शिल्पाचाही एक लाखाचा सट्टा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यास राजस्थान रॉयल्स संघातील राज कुंद्राची भागीदारी जप्त होईल, अशी माहिती टीमच्या व्यवस्थापकांनी दिली. कुंद्राला याप्रकरणी निलंबित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याला संघातील शेअरलाही मुकावे लागेल. या संघात त्याची 11.7 टक्क्यांची भागीदारी आहे. यासह फ्रँचायझीच्या नियमानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल.

आयपीएल-6 स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कुंद्राची सखोल चौकशी केली. मागील तीन वर्षांपासून तो सट्टेबाजीमध्ये सक्रिय होता, अशी माहिती पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी दिली.

राजस्थान रॉयल्सचे अध्यक्ष रंजित बर्थाकूर व कार्यकारी अधिकारी रघू अय्यर म्हणाले की, फ्रँचायझी चालवण्यात कुंद्राची कोणतीही भूमिका नाही. आमच्या मते कुंद्रा कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मात्र, दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी राज कुंद्राला चौकशीसाठी पुन्हा बोलावले होते.

शिल्पाचा एक लाखाचा सट्टा
सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीने आयपीएल-6 मध्ये राजस्थान रॉयल्स टीमवर एक लाखाचा सट्टा लावला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली. दरम्यान, पोलिसांनी तिचीही चौकशी केली. कुंद्राने 2011 मध्ये 50 लाख, 2012 मध्ये 40 लाख आणि 2013 मध्ये 12 लाख रुपयांचा सट्टा लावला होता.