आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Cricket Association President Lalit Modi, News In Marathi, Sports

RCA वर बंदी; अध्यक्षपदी निवडीनंतर BCCI चा ललित मोदींना झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) माजी आयुक्त ललित मोदी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी ललित मोदींची निवड झाली आहे. यानिवडीसह ललित मोदी यांनी अखेर बीसीसीआयमध्ये पुनरागमन केले आहे. बीसीसीआयला कोर्टाने मोठा झटका दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, दूसरीकडे, बीसीसीआयने आरसीएवरच बंदी घालत मोदींना दणका दिला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज (मंगळवारी) राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निकालांची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे कोर्टाने नेमलेले निरिक्षक एनएम कासलीवाल आणि एसपी पाठक यांनी निकालांची घोषणा केली. मोदींना 24 तर रामपाल शर्मा यांना केवळ चार मते मिळाली.

'आरएसए'चे निकाल जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय नियमांनुसार कारवाई करू शकते, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोदींना पुनरागमन करणे सोपे नसणार नाही. कारण, बीसीसीआय आणि कायदेतज्ज्ञ मोठा अडथळा निर्माण करण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.

बीसीसीआयने ललित मोदी यांच्या निवडणुक लढण्यावर आक्षेप घेतला होता. एवढेच नाही तर त्यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे. बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारात फेरफार केल्याचा आरोप ललित मोदींवर आहे. बंदी घातल्यानंतरही ललित मोदींनी लंडन येथून आसीएची निवडणूक लढविली होती.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या आदेशाला केराची टोपली दाखवत 19 डिसेंबर 2013 रोजी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायधिशांच्या देखरेखीत जयपूर येथे निवडणूक घेतली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, ललित मोदींनी लंडनमधून लढवली 'आरसीए'ची निवडणूक