आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर- भारतीय क्रिकेट टीमचे माजी मानसोपचार प्रशिक्षक पॅडी ऑप्टन हे राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचे मानसोपचार प्रशिक्षक असलेले 44 वर्षीय पॅडी एप्रिल महिन्यात होणा-या इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या सत्रात रॉयल्सला प्रशिक्षण देतील.
ऑप्टन यापूर्वी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या कार्यकाळात मानसोपचार प्रशिक्षक होते. त्यांच्या कारकीर्दीत टीम इंडियाने 2011 मध्ये एकदिवसीय क्रिकेटचे विश्वविजेतेपद पटकावले होते. दक्षिण आफ्रिकेने नंतर कर्स्टन आणि पॅडी यांच्या मार्गदर्शनानंतर कसोटीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राहुल दव्रिडसारख्या क्रिकेटपटूबरोबर पुन्हा काम करणे ही अभिमानाची बाब आहे. टीममध्येही अनेक प्रतिभावान खेळाडू आहे. नवीन सत्रात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, पॅडी यांनी म्हटले. द्रविडनेही पॅडीबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.