आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : राजस्थानचा विजयी पंच, सलग पाचवा विजय; धाेनी ब्रिगेडचा पहिला पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या राजस्थान राॅयल्स संघाने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयाचा पंच मारला. राजस्थान संघाने रविवारी अापल्या पाचव्या सामन्यात धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा ८ गडी राखून पराभव केला. यासह राजस्थान संघाने सलग पाचव्या विजयाची नाेंद करताना गुणतालिकेतील अापले अव्वल स्थान मजबूत केले.

सामनावीर अजिंक्य रहाणे (नाबाद ७६) अाणि शेन वाॅटसन (७३) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर राजस्थान संघाने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना धाेनी ब्रिगेडने २० षटकांत चार गडी गमावून १५६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात १८.२ षटकांत विजयाची नाेंद केली. यासह चेन्नई सुपरकिंग्जला यंदाच्या सत्रात पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

धावांचा पाठलाग करणा-या राजस्थान संघाकडून रहाणे अाणि वाॅटसनने दमदार सुरुवात करून दिली. तसेच स्मिथ (६) अाणि करुण नायरने नाबाद १ धाव काढून संघाचा शानदार विजय साकारला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या चेन्नई सुपरकिंग्ज संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर मॅक्लुम (१२), सुरेश रैना (४), डुप्लेसिस (१) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ब्राव्हाेने नाबाद ६२ व धाेनीने ३१ धावांची खेळी करून चेन्नई सुपरकिंग्जच्या टीमला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.
पुढे वाचा, राहणे आणि वॉटसन ठरले हिरो...