आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Royals Ninth Victory; Panjab Defeated By 9 Wickets

IPL : राजस्थान रॉयल्सचा नववा विजय; पंजाबला 9 गड्यांनी नमवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - सलग तिस-या सामन्यात अर्धशतक ठोकून आपण ‘दमदार’ असल्याचे अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. रहाणेच्या फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सची टीम मजबूत स्थितीत पोहोचली आहे. राजस्थान रॉयल्सने आपले विजयी अभियान कायम ठेवताना किंग्ज इलेव्हन पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानावर 8 गड्यांनी नमवत आयपीएल-6 मध्ये नववा विजय मिळवला. किंग्ज इलेव्हनला बंगळुरूविरुद्ध शानदार कामगिरी पुन्हा करता आली नाही. मिलर फ्लॉप तर पूर्ण संघ फ्लॉप झाला. राजस्थानच्या विजयात अजिंक्य रहाणे (59*), संजू सॅमसन (47*) आणि केवोन कुपर (3/23) यांनी सिंहाचा वाटा उचलला.


या नवव्या विजयासह राजस्थानने प्ले ऑफमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुसरीकडे 12 सामन्यांत सात पराभवानंतर किंग्ज इलेव्हनची टीम प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाली आहे. राजस्थानने विजयासाठी आवश्यक धावा (147/2) 19 व्या षटकातच काढल्या. रहाणे आणि संजू सॅमसन यांच्याशिवाय शेन वॉटसननेसुद्धा 31 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून रहाणेने दोन महत्त्वपूर्ण भागीदा-या केल्या. त्याने दुस-या विकेटसाठी शेन वॉटसनसोबत 66 आणि तिस-या विकेटसाठी सॅमसनसोबत नाबाद 76 धावांची भागीदारी केली. किंग्ज इलेव्हनच्या गोलंदाजांना राजस्थानच्या फलंदाजांवर अंकुश लावता आला नाही.


गिलख्रिस्ट, मार्शची दमदार फलंदाजी
तत्पूर्वी, टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सने अखेरच्या पाच षटकांत चांगली गोलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबला 6 बाद 145 धावांवर रोखले. पंजाबकडून कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट (42) आणि शॉन मार्श (77) यांनी दुस-या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. अखेरच्या पाच षटकांत पंजाबने 3 विकेट गमावल्या आणि त्यांना फक्त 38 धावा काढता आल्या. कुपरने मार्श आणि खतरनाक मिलरला 19 व्या षटकात तीन चेंडूंच्या अंतरात बाद केले. मार्शने 64 चेंडूंत 77 धावा काढताना 2 षटकार आणि 6 चौकार मारले. मिलरला फक्त आठ धावा काढता आल्या. मनप्रीत गोनीला अखेरच्या षटकात जेम्स फुल्कनरने बाद केले.


कुपर चमकला
उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज केवोन कुपरने चार षटकांत 23 धावांत 3 विकेट घेतल्या. चंदिलाने 24 धावांत एक आणि फुल्कनरने 37 धावांत 1 तर वॉटसनने 19 धावांत 1 विकेट घेतली.


5 षटकांत फक्त 38 धावा
मार्श आणि गिलख्रिस्ट यांनी दुस-या विकेटसाठी निश्चितपणे 102 धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरच्या 5 षटकांत किंग्जच्या फलंदाजांना फक्त 38 धावा काढता आल्या. यामुळे त्यांना 150 चा टप्पा सुद्धा गाठता आला नाही. या खेळपट्टीवर चेंडू थोडा थांबून येत होता. यामुळे मनसोक्त फलंदाजी करता आली नाही.


संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : 6/145 (शॉन मार्श 77, गिलख्रिस्ट 42, 3/23 कुपर), राजस्थान रॉयल्स :1 9 षटकांत 2/147 (अजिंक्य रहाणे नाबाद 59, संजू सॅमसन नाबाद 47, शेन वॉटसन 31)