आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Royals Player Informs Board Got An Offer Of Money To Fix Ipl Game News In Marathi.

IPL-8 वर \'मॅच फिक्सिंग\'चे सावट: मला मिळाली ऑफर, RRच्या क्रिकेटपटूचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आठव्या पर्वावरही 'मॅच फिक्सिंग' सावट पसरले आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सच्या (RR) एका क्रिकेटपटूला 'मॅच फिक्सिंग'ची ऑफर मिळाल्याची धक्कादायक माहिती बीसीसीआयच्या एंटी करप्शन यूनिटने दिली आहे.

रणजी खेळणार्‍या एका सहकार्‍याने निश्चित पॅटर्ननुसार आपण खेळलो तर त्या बदल्यात तो बक्कळ पैसा देईल, असा गोप्यस्फोट राजस्थान रॉयल्सच्या एका क्रिकटपटूने म्हटले आहे. हा क्रिकेटपटू मुंबईचा रहिवासी असून त्याचे नाव समजू शकले नाही. परंतु, या क्रिकेटपटून ही ऑफर फेटाळून राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाला हा प्रकार सांगितला. नंतर राजस्थान रॉयल्सने एंटी करप्शन अॅण्ड सिक्युरिटी यूनिटला (एसीएसयू) तत्काळ ही माहिती दिली.

'ऑफर देणार्‍या व्यक्तीसोबत आपण रणजी ट्रॉफीदरम्यान ड्रेसिंग रूम शेअर केली होती. निश्चित पॅटर्ननुसार खेळल्यावर आपल्या बक्कळ पैसा कमावता येईल, परंतु आपण ही ऑफर फेटाळल्याचे या क्रिकेटपटूने एसीएसयूला सांगितले. याप्रकरणी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना माहिती देण्यात आली आहे. एसीएसयूचे प्रमुख रवी सवानी यांनी मात्र याप्रकरणी मौन धारण केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 2013 मध्ये समोर आले होते 'मॅच फिक्सिंग'चे प्रकरण...