आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : राजस्थानचा ‘अजिंक्य’तारा चमकला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- अजिंक्य रहाणेच्या (नाबाद 68) अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सचा 87 धावांनी पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 179 धावा काढल्या. यानंतर मुंबईला अवघ्या 92 धावांत गुंडाळले.

मुंबईकडून धावांचा पाठलाग करताना दिनेश कार्तिकने सर्वाधिक 30 आणि अंबाती रायडूने 27 धावा काढल्या. इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. सचिन तेंडुलकर (1), रिकी पाँटिंग (4), रोहित शर्मा (2), केरोन पोलार्ड (1), आर. धवन (0), हरभजनसिंग (1) यांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. राजस्थानकडून जे.पी. फुल्कनरने 16 धावांत 3 गडी बाद केले. ए. चांदिलाने सचिन तेंडुलकर आणि पाँटिंगच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.


तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या बळावर 3 बाद 179 धावा ठोकल्या. रहाणेने नाबाद 68 धावा काढल्या. राजस्थानकडून वॉटसन आणि रहाणे यांनी 62 धावांची सलामी दिली. वॉटसनने 25 चेंडूंत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 31 धावा कुटल्या. तो बाद झाल्यानंतर तिस-या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या डी. याग्निकने 34 धावांचे योगदान दिले. त्याने अवघ्या 24 चेंडूंत 1 षटकार आणि 4 चौकारांसह ही खेळी साकारली. स्टुअर्ट बिन्नी (4) या वेळीही अपयशी ठरली. ब्रेड हॉजने रहाणेच्या मदतीने संघाला 175 चा टप्पा ओलांडून दिला. हॉजने अवघ्या 15 चेंडूंत 2 षटकारांसह नाबाद 27 धावा काढल्या.