आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान रॉयल्सचा सलग चौथा विजय; हैदराबादवर सहा गड्यांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या राजस्थान राॅयल्स संघाने गुरुवारी अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत ‘अजिंक्य’ विजयाचा चाैकार मारला. राजस्थान संघाने विजयाची लय कायम ठेवताना सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. राजस्थानने सहा गड्यांनी शानदार विजयाची नाेंद केली.

राजस्थानच्या टीमचा स्पर्धेतील हा सलग चाैथा विजय ठरला. या विजयासह राजस्थान राॅयल्सने गुणतालिकेतील अापले अव्वल स्थान मजबूत केले. अजिंक्य रहाणेचा (६२) झंझावात, बिन्नी (नाबाद १६) व जेम्स फाॅकनरच्या (नाबाद ६) चाैकाराच्या बळावर राजस्थानने राेमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला १२७ धावा काढता अाल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने ४ गड्यांच्या माेबदल्यात हे लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानला अजिंक्य रहाणे अाणि संजू सॅमसनने विजयाचा मजबूत पाया रचून दिला. या जाेडीने संघाला ६४ धावांच्या भागीदारीची शानदार सलामी दिली. दरम्यान, बाेपाराने ही जाेडी फाेडली. त्याने सॅमसनला (२६) बाद केले. स्टीव्हन स्मिथने (१३) रहाणेला साथ देऊन संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नी व रहाणेने अभेद्य भागीदारी करून विजय निश्चित केला.

नाणेफेक जिंकून राजस्थान टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या हैदराबादची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर (२१), शिखर धवन (१०) अाणि इयान माेर्गन (२७) फार काळ अाव्हान कायम ठेवू शकले नाहीत. प्रवीण तांबे व धवनच्या गाेलंदाजीसमाेर हैदराबादच्या दिग्गजांचा फार काळ टिकाव लागला नाही. या दाेन्ही गाेलंदाजांनी प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.