आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानचा धावांचा डोंगर!, विनीतची 907 मिनिटात 257 धावांची सर्वोच्च खेळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - सलामीवीर विनीत सक्सेना (257) च्या कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ आणि तब्बल 907 मिनिटांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर गतचॅम्पियन राजस्थानने तामिळनाडूविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये तिस-या दिवशी 621 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात अवघ्या 66 धावांत 3 विकेट गमाविल्याने तामिळनाडूचा संघ संकटात सापडला आहे.
दिवसाअखेर तामिळनाडूचा संघ राजस्थानकडून अद्याप पहिल्या डावात 555 धावांनी मागे आहे. तामिळनाडूकडे 7 विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी दिनेश कार्तिक 26 आणि वासुदेवदास 25 धावा काढून खेळत होते.
तत्पूर्वी, सक्सेनाने 665 चेंडूंचा सामना करताना 26 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने मॅरेथॉन खेळी केली. दुस-या दिवसअखेर विनीत 207 धावांवर नाबाद होता. तिस-या दिवशी त्याने आपल्या खेळीत आणखी 50 धावांची भर घातली. सक्सेनाचा जोडीदार रॉबिन बिष्टने चौकारांच्या मदतीने 67 धावा काढल्या.
सक्सेना जगातला 3 रा संथ फलंदाज
विनीत सक्सेनाने द्विशतक तर ठोकले. मात्र या वेळी त्याने अत्यंत संथ फलंदाजी केली. यामुळे त्याचा जगातल्या सर्वाधिक संथ फलंदाजांच्या यादीत तिस-या क्रमांकावर समावेश झाला आहे. विनीतने एकूण 907 मिनिटे म्हणजे जवळपास 15 तास आणि 7 मिनिटे फलंदाजी केली. जगात संथ फलंदाजीचा विक्रम हिमाचलच्या राजीव नैयरच्या नावे आहे. त्याने रणजी सामन्यात जम्मू-काश्मीरविरुद्ध 271 धावा काढल्या होत्या. यासाठी तो 1015 मिनिटे खेळपट्टीवर होता. ही घटना 1999-2000 च्या सत्रातील आहे. दुस-या क्रमांकावर पाकिस्तानचा हनिफ मोहम्मद (970 मिनिटे, 337 धावा, वेस्ट इंडीजविरुद्ध, ब्रिजटाऊन 1957-58.) आहे.