आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajeev Shukla Resigns As Indian Premier League Chairman.

राजीव शुक्ला यांनी दिला आयपीएल कमिशनरपदाचा राजीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे वादात आलेले देशातंर्गत क्रिकेटमध्ये सध्या जोरदार घडमोडी घडत आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत असतानाच आज अचानकपणे आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी राजीनामा दिला आहे.

याबाबत राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की, मागील काही काळातील वादग्रस्त घडामोडी बघता मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या राजीनाम्यामागे आयपीएल किंवा बीसीसीआय नसून, काँग्रेस पक्ष असल्याचे बोलले जाते. कालच काँग्रेसचे उपाध्यक्ष व पक्षाचे सर्वेसर्व्हा राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी क्रिकेटपासून दूर राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जपान दौ-यावरून परतत असताना राजकारण आणि खेळ एकत्र करू नका, असे आवाहन केले होते. त्यामुळे शुक्ला यांना एक तर मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला असता नाहीतर आयपीएलमधील कमिशनरपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. अखेर शुक्ला यांनी आय सायंकाळी कमिशनरपदाचा राजीनामा दिला.