आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajesh Sharma's Artical On Retirement Of Sachin Tendulkar

सचिनची थाटात निवृत्ती, मात्र... गांगुली, गावसकर कमनशिबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनच्या निवृत्तीमुळे सध्या देशभर उत्सवाचे वातावरण झाले आहे. कुठे सचिनची प्रशंसा, तर कुठे त्याच्यासाठी पूजा, प्रार्थना होत आहे. बंगाल क्रिकेट संघटना, मुंबई क्रिकेट संघटनेने सचिनच्या निवृत्तीसाठी खास तयारी केली. बंगाल क्रिकेट संघटनेने तिकिटांवर सचिनचा फोटो प्रकाशित केला. शिवाय टॉससाठी वापरण्यात आलेल्या नाण्यावर सचिनची छबी होती. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी सचिनच्या निवृत्तीला क्रिकेट इतिहासातील एक मोठी घटना असल्याचे म्हटले. मात्र, स्वत: गावसकर यांच्या निवृत्तीच्या वेळी काय घडले होते, हे आठवते का? भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार कपिल देव, मागच्या वर्षी निवृत्त झालेला राहुल द्रविड, 2008 मध्ये क्रिकेटला अलविदा म्हणणारा सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांना भिन्न परिस्थितीत निवृत्ती घ्यावी लागली.