आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल उद्घाटन सोहोळ्याआधी कौन्सिलची घोषणा; शुक्ला अध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल स्पर्धेच्या उद्घाटनाला काही तास शिल्लक राहिले असताना बीसीसीआयने सोमवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची घोषणा केली. आयपीएल कौन्सिलचा राजीनामा देणारे राजीव शुक्ला यांच्याकडेच नव्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. श्रीनिवासन यांच्या कारकीर्दीत कोशाध्यक्षपद सोडणारे महाराष्ट्राचे अजय शिर्के यांनाही या समितीवर स्थान देण्यात आले आहे. कौन्सिलवर क्रिकेटपटू म्हणून दोन सदस्यांच्या जागांवर रवी शास्त्री व सौरव गांगुली यांची वर्णी लागली आहे.

कौन्सिलचे सदस्य असे
राजीव शुक्ला (अध्यक्ष), सुबीर गांगुली, अजय शिर्के, कपिल मल्होत्रा, सौरव दास गुप्ता, बिकास बरूहा, अशोक आनंद, टी.एन. अनंतनारायण, डॉ. पी.व्ही. शेट्टी, सौरव गांगुली, रवी शास्त्री, ज्योतिरादित्य शिंदे. शिस्तविषयक समिती : जगमोहन दालमिया (अध्यक्ष),ज्योतिरादित्य शिंदे, के. पी. कजारिया.
बातम्या आणखी आहेत...