आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान राॅयल्स दिल्लीविरुद्ध अजिंक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाैकार खेचनाता अजिंक्य रहाणे.
मुंबई - अजिंक्य रहाणे (नाबाद ९१) आणि करुण नायर (६१) यांच्या ११३ धावांच्या भागीदारीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने आठव्या सत्राच्या आयपीएलमध्ये विजय मिळवला. राजस्थान राॅयल्सने रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४ धावांनी मात केली. यासह राजस्थान संघाने यंदाच्या सत्रात सहाव्या विजयाची नाेंद केली. दुसरीकडे दिल्लीला पाचव्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला दिल्लीपुढे विजयासाठी १९० धावांचे आव्हान उभे करता आले. प्रत्युत्तरात दिल्लीने ७ गडी गमावून १७५ धावांवर गाशा गुंडाळला. धवल कुलकर्णी, बिन्नी व फाॅकनरने प्रत्येकी दाेन गडी बाद करून राजस्थानला विजय मिळवून दिला. वाॅटसनने एक बळी घेतला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी ५०० वा आयपीएल सामना खेळवला गेला.

साधे-सरळ खेळलो : रहाणे
यंदा सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजाची ‘ऑरेंज कॅप’ सतत आपल्याजवळ ठेवणा-या अजिंक्य रहाणेने ब्रेबॉर्न स्टेडियमवर तो बहुमान मिळविला. ९ डावांमध्ये आतापर्यंत ४३० धावा काढणा-या अजिंक्यने ब्रेबॉर्नच्या विचित्र खेळपट्टीवरही नाबाद ९१ धावा फटकावल्या. आपल्या त्या खेळीचे रहस्य सांगताना, तो म्हणाला, जेव्हा जेव्हा मी काहीतरी वेगळे करायला जातो, तेव्हा बाद होतो. म्हणून आज मनाशी खूणगाठ बांधून आलो होतो की, साधे-सरळ खेळायचे. मी माझी नेहमीच्या शैलीतील फलंदाजी केली.