आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajyavardhan Singh Rathore Leaves Army, Joins BJP

राजवर्धन राठोडच नव्‍हे तर या क्रीडापटूंनीही मारली राजकीय आखाडयात उडी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिकमध्‍ये भारताला शुटिंगमध्‍ये सिल्‍वर मेडल मिळवून देणारे कर्नल राजवर्धन राठोड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सर्वांनाच धक्‍का दिला आहे. गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थित या लष्‍करी अधिका-याने भाजप प्रवेश केला. मैदानातून त्‍यांनी थेट राजकारणाच्‍या रणांगणातच उडी मारली आहे.

कर्नल राजवर्धन राठोड यांनी 2004सालच्‍या अथेन्‍स ऑलिम्पिकमध्‍ये डबल ट्रॅपमध्‍ये सिल्‍वर मेडल मिळवले होते. गेली अनेक वर्षे सैन्‍यात काम करून भारताची सेवा केलेल्‍या राठोड यांनी आपले काम बदलून राजकारणात एंट्री मारली असून यासाठी त्‍यांनी भाजपला निवडले आहे. देश आता एका धोकादायक स्थितीतून जात आहे. अशावेळी मागे हटले नाही पाहिजे, असे 43वर्षीय राठोड यांनी यावेळी म्‍हटले. राठोड यांनी नुकताच लष्‍करातून स्‍वेच्‍छानिवृत्ती पत्‍करली आहे.

क्रीडापटूने राजकारणात प्रवेश करण्‍याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक क्रीडापटूंनी सक्रिय राजकारणात येऊन आपले नशीब आजमावून पाहिले. त्‍यातील काही यशस्‍वी ठरले तर काहींनी हे आपले काम नाही म्‍हणत राम राम ठोकला. मैदानातील इनिंगनंतर राजकारणाच्‍या आखाडयात उडी घेणा-या भारतातील क्रीडापटूंबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...