आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranajee Cricket Maharashtra Team Captain Motwani Half Century

कर्णधार मोटवाणीचे अर्धशतक; महाराष्ट्राला विजयाची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- रणजी लढतीत महाराष्ट्राने पहिला डाव 9 बाद 401 धावांवर घोषित केला. यजमान संघाने जम्मू-काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात 324 धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात दुसर्‍या दिवसअखेर जम्मू-काश्मीरने 1 बाद 131 धावा काढल्या. महाराष्ट्राकडे अजून 185 धावांची आघाडी असून जम्मूचे 9 फलंदाज शिल्लक आहेत.
कालच्या 2 बाद 185 धावांच्या पुढे खेळताना महाराष्ट्राच्या फलंदाजांनी दुसर्‍या दिवशी 224 धावांची भर घातली. हर्षद खडीवालेने 87 धावा केल्या. त्याने 185 चेंडूचा सामना करताना 12 चौकार लगावले. गत सामन्यात दीड शतकी खेळी करणारा केदार जाधव (41) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेला अंकित बावणे (18) मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार रोहित मोटवाणीने संघाचा डाव सावरत अर्धशतक ठोकले. त्याने 96 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांच्या मदतीने 84 धावा ठोकल्या. त्याला मो. मुदस्सरने एस. बेगकरवी झेलबाद केले. अक्षय दरेकरने 23 आणि अनुपम संकलेचाने 37 धावा केल्या.
जम्मू-काश्मीरच्या मो. मुदस्सरने 26 षटकांत 87 धावा देत 5 गडी टिपले. एस. बेगने 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरने दुसर्‍या डावात दिवस अखेर 1 बाद 131 धावा केल्या.