आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranchi Odi Sri Lanka Opts Batting Kedar Jadhav Makes India Debut

विराटच्‍या \'स्‍फोटक\' खेळीने भारताचा दणदणीत विजय, श्रीलंकेला क्‍लीनस्‍वीप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - धडकेबाज शतक ठोकून क्रिकेट प्रेक्षकांना अभिवादन करताना विराट कोहली)

रांची -
भारतीय संघाचा युवा कर्णधारविराट कोहलीच्‍या नाबाद 139 धावांच्‍या जोरावर भारताने चार गडी राखून श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तसेच श्रीलंकेविरुद्ध 5-0 ने मालिका खिशात घातली. विराटने 12 चौकार आणि तीन उत्तुंग षटकाराच्या मदतीने विजयश्री खेचून आणली.
तत्‍पूर्वी, सुरूवातीला अवघ्या 64 धावांवर भारताचे दोन गडी बाद झाल्यानंतर संघात अस्वस्थता पसरली होती. मात्र, विराट मैदानावर उतरताच त्याने सामना सांभाळला. मात्र टीम इंडियामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळणारा केदार जाधव अवघ्या 20 धावांवर मेंडीसच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. तर बिन्नी आणि आर. आश्विन एकापाठोपाठ मेंडीसच्या गोलंदाजीवर बाद झाले.
टीम इंडीयाला पहिला झटका अजिंक्य रहाणे (2 धावा) च्या रुपाने बसला. अजिंक्यला मॅथ्यूजने क्लिन बोल्ड केले. या झटक्यातून अजून टीम इंडीया सावरते ना सावरते तोच वर्ल्ड रेकॉर्ड करणारा रोहित शर्मासुध्दा 9 धावांवर बोल्ड झाला.
श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची शतकीय खेळी,
श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (नाबाद 139 रन) ची शतकीय आणि लाहिरू थिरमानेच्या (52 धावा) अर्धशतकीय खेळामुळे श्रीलंकेने भारतासमोर पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 287 धावांचे टारगेट दिले आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंका टीमला सुरूवातीला झटका बसला, मात्र कर्णधार मॅथ्यूज मैदानावर उतरले असता त्यांनी श्रीलंकेची बाजू सावरली आणि निर्धारित 50 षटकांमध्ये 286 धावा बनवल्या. भारतातर्फे धवल कुलकर्णीने तीन, अक्षर पटेल आणि आर. आश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
85 धावांवर चार गडी बाद
पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळत असलेला डिकवेला बाद होताच श्रीलंकेला पहिला झटका मिळाला. अवघ्या चार धावा काढल्या असताना धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने डिकवेलाला कॅच केले. काही वेळातच तिलकरत्ने दिलशान ( 31 धावा ) ला स्टुअर्ट बिन्नीने क्लिक बोल्ड करत लंकेला दुसरा झटका दिला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या चांडीमल ( 5 धावा ) याला अक्षय पटेलने रोहित शर्माच्या हाताने कॅच करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर जयवर्धनेला आर. आश्विनने 32 च्या स्कोअर असताना बाद केले.
या सामन्यात भारताकडून या सामन्यात सुरेश रैनाला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी महाराष्ट्राच्या केदार जाधवला टीम इंडीयामध्ये जागा देण्यात आली आहे.
भारताने पाच सामन्यांच्या या एकदिवसीय क्रीकेट मालिकेत 4-0 अशी आघाडी मिळवली आहे. या यशामध्ये केवळ रोहित शर्माच नाही तर इतर खेळाडूंनीही चांगली कामगिरी बजावली आहे.
आजच्या सामन्यात महाराष्ट्राचा केदार जाधव हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव याला सुध्दा विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी ऑफ स्पिनर आर. आश्विनला घेण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, मॅचची काही क्षणचित्रे...