Home »Sports »Other Sports» Ranchi Rhinose Defeat Uttar Pradesh Wizards By 3-1

रांची रायनोजचा उत्तर प्रदेश विझर्डस् वर 3-1 ने शानदार विजय

वृत्तसंस्था | Jan 25, 2013, 05:45 AM IST

  • रांची रायनोजचा उत्तर प्रदेश विझर्डस् वर 3-1 ने शानदार विजय

रांची - यजमान रांची रायनोजने हीरो हॉकी इंडिया लीगमध्ये गुरुवारी उत्तर प्रदेश विझर्ड्सवर 3-1 ने विजय मिळवला. या विजयासह रांचीने उत्तर प्रदेशला गतसामन्यातील पराभवाची परतफेड केली. मोरित्ज फुर्स्ते, निक विल्सन, अ‍ॅशे जॅक्सनने सुरेख गोल करून यजमान संघाला विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशकडून ल्युक डोएर्नरने एकमेव गोल केला. रांचीने विजयासह 16 गुणांची कमाई करत गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले.

आक्रमक सुरुवात करणा-या रांचीने 28 व्या मिनिटाला सामन्यात आघाडी घेतली. कर्णधार मोरित्जने रांचीकडून गोलचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत यूपी विझर्ड्सला लढतीत बरोबरी मिळवता आली नाही.अखेर, 53 व्या मिनिटाला डोएर्नरने गोल करून गोल करून विझर्ड्सला बरोबरी मिळवून दिली. मात्र, 66 व्या मिनिटाला निक विल्सनने गोल करून रांचीला आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यासाठी 30 सेकंद शिल्लक असताना अ‍ॅश्लेने गोल करून रांचीचा मोठ्या फरकाने विजय निश्चित केला.

मुंबईचा सलग पाचवा पराभव
जालंधर येथील मैदानावर जेपी पंजाब वॉरियर्सने गुरुवारी रात्री मुंबई मॅजिशियन्सचा 4-3 अशा फरकाने पराभव केला. यासह मुंबईला लीगमध्ये सलग पाचव्या पराभवास सामोरे जावे लागले. संदीप सिंगच्या मुंबईला अद्याप लीगमध्ये विजयाचा सुर गवसला नाही. यामुळे 5 गुणांसह मुंबई गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.

मोरित्जेला ग्रीन कार्ड
मध्यंतरानंतर सुरू झालेल्या रोमांचक सामन्यात पंचांनी दिलेल्या निर्णयावर रांचीचा प्रशिक्षक ग्रेग क्लार्कने दोन वेळा आक्षेप घेतला. त्यानंतर संतप्त झालेल्या क्लार्कने साइडलाइनवरून पंचांना शिव्या देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत पंचांनी रांचीचा कर्णधार मोरित्जेला ग्रीन कार्ड देऊन पाच मिनिटे सामन्याबाहेर बसवले. पुन्हा त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली.

Next Article

Recommended