आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॅनफोर्ड ओपन टेनिस: रंदावास्का, सिबुलकोवा अंतिम चारमध्ये दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॅनफोर्ड- जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली एग्निजस्का रंदावास्का व स्लोव्हाकियाच्या डोमिनिका सिबुलकोवाने स्टॅनफोर्ड ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये धडक मारली. पोलंडच्या रंदावास्काने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या वारंवारा लेपचेंकोचा पराभव केला. तिने 7-6, 3-6, 6-3 अशा फरकाने सामना जिंकला. दुसरीकडे स्लोव्हाकियाच्या सिबुलकोवाने पोलंडच्या उसुझुला रंदावास्काचा पराभव केला. तिने 7-5, 6-3 ने सामना आपल्या नावे केला.

रशियाच्या वेरा डुसेइविनाचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. तिला अमेरिकेच्या जेमिई हाम्पटोनने पराभूत केले. चौथ्या मानांकित हाम्पटोनने 6-4, 6-3 ने लढतीत विजय मिळवला. तिने सहज विजय मिळवून महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ओल्गा स्पर्धेतून बाहेर
जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या ओल्गा गोर्वोस्टोव स्पर्धेतून बाहेर पडली. पाचव्या मानांकित सोरेना क्रिस्टियाने बेलारूसच्या ओल्गा गोवास्तोवाचा पराभव केला. तिने 6-3, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला.