आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rangana Hearath And Mahela Jaywardhane Evicted From Sri Lankan Cricket Team

महेला जयवर्धने, हेराथला श्रीलंका टीममधून डच्चू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- बांगलादेशविरुद्ध दोन एकदिवसीय सामन्यांसाठी सोमवारी 16 सदस्यीय श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली. या संघातून स्पिनर रंगना हेराथला वगळण्यात आले. संघामध्ये तीन नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली. जखमी माजी कर्णधार महेला जयवर्धनेलादेखील विश्रांती देण्यात आली. अकिला धनंजयालाही बाहेर ठेवण्यात आले.

दुसरीकडे तिलकरत्ने दिलशानची संघात निवड झाली आहे. येत्या 23 मार्चपासून श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होईल. हंबनटोटा येथे सलामी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली श्रीलंका टीम या मालिकेत खेळणार आहे.