आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंजन सोधीच आहे खेलरत्नचा हक्कदार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी वादविवादांचा देखावा झाला असून डिस्कस थ्रोअर कृष्णा पुनिया आणि पॅरालिम्पिक प्लेअर एच. एन. गिरिशा यांचा दावा फेटाळण्यात आला आहे. नेमबाज रंजन सोधीलाच पुरस्कार दिला जाईल, हे निश्चित झाले आहे. दावेदारीनंतर संपूर्ण चौकशी आणि पुरस्कारासाठी असलेल्या गाइडलाइननंतरच हा निर्णय घेण्यात आला. रंजन सोधीला खेलरत्न जाहीर करण्याचा निर्णय एकदम योग्य आहे.

कृष्णा पुनियाबाबत बोलायचे झाल्यास लंडन ऑलिम्पिकमध्ये तिला एकही पदक जिंकता आले नाही. मात्र, आंतरराष्‍ट्रीय स्तरावर तिची कामगिरी समाधानकारक ठरली. तिने 2006 आणि 2010 च्या एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले आहे. दिल्ली कॉमनवेल्थ 2010 मध्येसुद्धा तिने सुवर्णपदक जिंकले होते. भारतात क्रीडा क्रांतीमध्ये महिला खेळाडूंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महिला खेळाडूंनी खूप पदके जिंकली आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सायना नेहवाल असो किंवा एम. सी. मेरिकोम या खेळाडूंनी आपल्या दमदार प्रदर्शनाने महिला सशक्तीकरणाची प्रचिती दिली आहे. या खेळाडूंना लिंगभेद आणि सामाजिक विरोधाचासुद्धा सामना करावा लागला. यानंतरही या खेळाडूंनी जगभर नावलौकिक केले. या खेळाडूंनी विजयासाठी जी इच्छाशक्ती दाखवली, त्याची तुलना आकडेवारी किंवा पुरस्कारांशी होऊ शकत नाही. यानुसार कृष्णा पुनियाला खेलरत्न पुरस्कार मिळाला नसला तरीही तिच्या कामगिरीला मुळीच कमी लेखले जाऊ शकत नाही.

पॅरालिम्पिकपटू गिरिशानेसुद्धा अपंगत्वानंतर विजयासाठी झुंज देत लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. आपल्या देशात रोजच्या जीवनात अपंगांच्या वाट्याला उपेक्षाच येते. आपल्या देशात खेळाडू कामगिरीच्या बळावर नोकरीत प्रमोशन आणि आर्थिक सुरक्षेसाठी दावेदार आहेत. यामुळेच प्रत्येकाला वाटते की आपल्याला पुरस्कार मिळाला हवा आणि भविष्य सुरक्षित झाले पाहिजे. खरे पाहिले तर भारतात अजूनही खेळात योग्य रीतीने प्रोफेशनलिझम आलेला नाही. खेळाडूंसमोर (क्रिकेटपटू वगळता) कारकीर्द संपल्यानंतर जीवन सुरक्षित करण्याची सर्वांत मोठी चिंता असते. यामुळे खेळात विविध पुरस्कारांच्या मदतीने ते सुरक्षित बनू इच्छितात. यात चुकीचे काहीच नाही. क्रीडा मंत्रालयाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी पुनिया आणि गिरिशाच्या दावेदारीला महत्त्व न देता सोढीची निवड करून चूक केली नाही. सोधीची कामगिरी या दोघांपेक्षा खूप मोठी आहे. यामुळे त्याचा दावा अधिक मजबूत होतो. तसेसुद्धा शासनाने बिलियर्ड्स सम्राट मायकेल फरेराच्या नेतृत्वाखाली पुरस्कार समितीची घोषणा केली तर काही चुकीचे होण्याची शक्यता कमीच आहे. होय, पुनिया आणि गिरिशा यांनी जे आव्हान दिले होते, त्याची हवा फुस्स झाली. या दोघांनी हा विचार करायला हवा की फरेरा स्वत: विश्वस्तरीय खेळाडू राहिले आहेत. भारतीय क्रीडा जगताशी त्यांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत. त्यांना सर्वकाही कळते आणि माहिती आहे. खेळाडूंनी अशा प्रकारचे आव्हान दिल्याने निश्चितपणे वातावरण कलुषित होते. कृष्णा पुनिया आणि गिरिशा यांच्यासाठी सर्वकाही संपलेले नाही. त्यांनी संयम बाळगावा. पुढच्या वेळेस या दोघींपैकी एकाची खेलरत्नसाठी वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.