आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Cup : Ankit Made Half Century, Maharashtra Led Against Karnatka

रणजी करंडक: अंकितचे अर्धशतक; महाराष्‍ट्राची कर्नाटकविरूध्‍द आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - कर्नाटकविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये चौथ्या दिवसअखेर दुस-या डावात महाराष्‍ट्राने 6 बाद 272 धावा काढल्या. संघाकडे आता 62 धावांची नाममात्र आघाडी झाली आहे. तत्पूर्वी कर्नाटकने पहिल्या डावात 515 धावा काढल्या. महाराष्‍ट्राच्या केदार जाधवने (112) शतक आणि अंकित बावणेने (61) अर्धशतकी खेळी केली.
कर्नाटकचा डाव कालच्या 7 बाद 474 धावांच्या पुढे खेळताना 515 धावांवर संपुष्टात आला. विनयकुमारने 28, श्रेयस गोपालने 10 आणि अभिमन्यू मिथुनने 16 धावांचे योगदान दिले. संघाने महाराष्‍ट्राविरुद्ध पहिल्या डावात 210 धावांची आघाडी घेतली. दुस-या डावात महाराष्‍ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हर्षद खडीवाले 9 धावांवर बाद झाला. सर्वांच्या नजरा असलेल्या विजय झोल (31) पुन्हा अपयशी ठरला. पहिल्या डावात शतक हुकलेल्या अंकित बावणेने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली. त्याने 115 चेंडंूचा सामना करताना 4 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या केदार जाधवने शतक ठोकले. त्याने 135 चेंडंूत 10 चौकार खेचत 112 धावा काढल्या. त्याला विनयकुमारने रॉबिन उथप्पाकरवी झेलबाद करून आपला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 300 बळींचा टप्पा पूर्ण केला. अतीतकर भोपळाही फोडू शकला नाही. खुराणाने 37 धावा काढल्या. दिवसअखेर मोटवाणी 3 व श्रीकांत मुंढे नाबाद 3 धावांवर खेळत होते.
अंकितचा धमाका
61 धावा
115 चेंडू
04 चौकार
02 अर्धशतक अंकितने या सामन्यात झळकवले. त्याने पहिल्या डावात 89 धावा काढल्या.
विनयकुमारचे 300 बळी पूर्ण
कर्नाटकच्या विनयकुमारने करिअरमध्ये प्रथम श्रेणीतील 86 व्या सामन्यात 300 बळी पूर्ण केले आहेत. त्याने शतकवीर केदार जाधवला झेलबाद करून हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्याने 21 षटकांत 84 धावांच्या मोबदल्यात 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. श्रेयस गोपालने 10 षटकांत 37 धावा देत 2 गडी बाद केले.
धावफलक
कर्नाटक कालच्या 7 बाद 474 धावांच्या पुढे
कर्नाटक धावा चेंडू 4 6
गोपाल झे. मोटवाणी गो. खुराणा 10 45 2 0
विनयकुमार नाबाद 28 60 3 0
मिथुन झे. मोटवाणी गो. मुंढे 16 26 2 0
अरविंद नाबाद 00 07 0 0
अवांतर : 25. एकूण : 171.1 षटकांत सर्वबाद 515 धावा. गोलंदाजी : समद फल्लाह 37-8-93-3, अनुपम संकलेचा 30-7-83-1, अक्षय दरेकर 29-4-108-0, श्रीकांत मुंढे 31.1-5-93-3, चिराग खुराणा 39-10-110-2, संग्राम अतीतकर 5-0-18-0.
महाराष्‍ट्र दुसरा डाव धावा चेंडू 4 6
हर्षद झे. गणेश गो. विनयकुमार 09 11 2 0
झोल झे. गौतम गो. विनयकुमार 31 51 4 0
बावणे झे. गौतम गो. गोपाल 61 115 4 0
जाधव झे. उथप्पा गो. विनयकुमार 112 135 10 0
अतीतकर झे. वर्मा गो. गोपाल 00 05 0 0
खुराणा झे. उथप्पा गो. विनयकुमार 37 70 1 0
रोहित मोटवाणी नाबाद 03 10 0 0
श्रीकांत मुंढे नाबाद 03 11 0 0
अवांतर : 16. एकूण : 68 षटकांत 6 बाद 272 धावा. गोलंदाजी : विनय 21-1-84-4, मिथुन 16-1-47-0, अरविंद 15-0-49-0, उथप्पा 2-0-15-0,पांडे 2-0-14-0, श्रेयस गोपाल 10-0-37-2, अमित वर्मा 2-0-20-0.