आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Final Match: Maharashtra Take Lead, Bangal Not Well Position

रणजी उपांत्य लढत: महाराष्‍ट्राची आघाडी,तर बंगालचा धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - वेगवान गोलंदाज समद फल्लाहच्या (7/58) भेदक मा-यापुढे रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पहिल्या दिवशी बंगालच्या डाव 114 धावांवर संपुष्टात आला. महाराष्‍ट्राने पहिल्या डावात दिवसअखेर 4 बाद 164 धावा काढल्या. संघाने 50 धावांची आघाडी घेतली. अंकित बावणे नाबाद 37 धावांवर खेळत आहे. महाराष्‍ट्राचा स्टार फलंदाज विजय झोल (1) अपयशी ठरला. केदार जाधवने 40 धावा केल्या. बंगालच्या अशोक डिंडा आणि लक्ष्मीरतन शुक्लाने प्रत्येकी 2 बळी घेतले. महाराष्‍ट्राचा कर्णधार रोहित मोटवाणीने टॉस जिंकणे फायद्याचे ठरले. बंगालच्या संघाने लंचपर्यंत 5 बाद 83 धावा केल्या.
बंगाली वाघ 114 धावांवर गारद :
लंचनंतर 100 धावा बंगालने पूर्ण केल्या. फल्लाहने अरिंदम दास (37), सौरव सरकार (8) आणि शिवशंकर पालला (0) बाद करत बंगालला 114 धावांवर रोखले. अनुपम संकलेचा, डोमिनिक जोसेफ व हर्षद खडीवालेने प्रत्येकी एक 1 गडी टिपला.
महाराष्‍ट्राची चांगली सुरुवात
महाराष्‍ट्राचा हर्षद खडीवाले (28) आणि चिराग खुराणा (48) या सलामीवीर जोडीने 78 धावांची सलामी दिली. विजय झोल अवघ्या एका धावेवर बाद झाला. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अंकित बावणे 37 तर रोहित मोटवाणी 8 धावांवर खेळत होते.