आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji: Maharashtra bangal Play Final Match Today

रणजी : महाराष्‍ट्र-बंगाल उपांत्य लढत आजपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - महाराष्‍ट्र विरुद्ध बंगाल रणजी उपांत्य फेरीच्या लढतीस इंदूर येथे शनिवारपासून सुरुवात होत आहे. 18 ते 22 दरम्यान होणा-या सामन्यासाठी महाराष्‍ट्राचा 15 सदस्यीय संभाव्य संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कर्णधार रोहित मोटवाणीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या महाराष्ट्राने बलाढ्य मुंबईला पराभूत करून 17 वर्षांनंतर उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेला केदार जाधव आणि 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार विजय झोलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या डावात शानदार अर्धशतकी खेळी करणा-या अंकित बावणेने लढतीच्या पूर्वसंध्येला फलंदाजी करताना नेटमध्ये घाम गाळला.
महाराष्‍ट्राच्या केदार जाधवने या सत्रात 1034 धावा काढल्या असून यात 5 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीवीर हर्षद खडीवाले (944 धावा) देखील जबरदस्त फॉर्मात आहे. युवा खेळाडू अंकित बावणे आणि विजय झोल बंगालसाठी अडचणीचे ठरू शकतात. गोलंदाजीची मदार 31 बळी घेणा-या अक्षय दरेकरवर असेल.
महाराष्‍ट्र : संभाव्य संघ
रोहित मोटवाणी (कर्णधार), हर्षद खडीवाले, चिराग खुराणा, केदार जाधव, संग्राम अतीतकर, अंकित बावणे, अनुपम संकलेचा, अक्षय दरेकर, समद फल्लाह, श्रीकांत मुंढे, विजय झोल, पुष्कराज चव्हाण, डॅमिनिक मुथ्यास्वामी, जय पांडे, शमशुद्दीन काझी.
प्रशिक्षक - सुरेंद्र भावे.