आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी : महाराष्ट्राविरुद्ध हिमाचलच्या 228 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गहुंजे स्टेडियमवर सुरू आलेल्या रणजी स्पर्धेत हिमाचल प्रदेशने यजमान महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावात 228 धावा काढल्या. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने बिनबाद 35 धावा केल्या. हिमाचलकडे आणखी 193 धावांची आघाडी आहे.
प्रथम फलंदाजी करताना हिमाचलने 76.2 षटकांत सर्वबाद 228 धावा काढल्या. यात प्रशांत चोप्रा (47) आणि वरुण शर्मा (27) या सलामीवीर जोडीने 76 धावांची सलामी दिली. मुथास्वामीने रोहित मोटवाणीकरवी वरुणला झेलबाद करून जोडी फोडली. प्रशांतने 62 चेंडंूत 7 चौकारांच्या मदतीने 47 धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या पारस डोग्राने 86 चेंडंूत 40 धावा केल्या. निखिल गंगता 27 आणि तळातील फलंदाज करणवीर सिंगने 33 धावा काढल्या. शशांक शर्माने नाबाद 18 धावा जोडल्या. महाराष्ट्राच्या समद फल्लाहने 21 षटकांत 48 धावा देत 3 बळी घेतले. श्रीकांत मुंढे, मुथ्थस्वामी आणि चिराग खुराणाने प्रत्येकी 2 गडी बाद केले. दिवसअखेर महाराष्ट्राने बिनबाद 35 धावा केल्या. सलामीवीर हर्षद खडीवाले नाबाद 17 आणि कर्णधार रोहित मोटवाणी नाबाद 13 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक : (हिमाचल प्रदेश 228 धावा. प्रशांत चोप्रा 47, पारस डोग्रा 40, करण वीर सिंग 33 धावा. समद फल्लाह 48/3, श्रीकांत मुंढे 44/2 बळी. महाराष्ट्र बिनबाद 35 धावा. हर्षद खडीवाले नाबाद 17, मोटवाणी नाबाद 13 धावा.)