आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी सामना : केदार जाधवचे शतक; महाराष्ट्राच्या 343 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - क गटातील रणजी लढतीत केदार जाधवच्या (128) शतकाच्या बळावर महाराष्ट्राने आसामविरुद्ध पहिल्या दिवशी 8 बाद 343 धावा काढल्या. दिवसअखेर अंकित बावणे (36) मैदानावर टिकून आहे.
नाणेफेक जिंकून यजमान आसाम टीमने पाहुण्या महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कर्णधार रोहित मोटवाणी 2 धावा करून तंबूत परताला. हर्षद खडीवालेने 24 धावा काढल्या. त्याला प्रीतम दासने बाद केले. त्यानंतर आलेल्या संग्राम अतीतकरने 46 आणि केदार जाधवने 128 धावा करत संघाचा डाव सावरला. केदारने 148 चेंडूंत 19 चौकार खेचत शतक झळकावले. पुष्कराज चव्हाणने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 94 चेंडूंत 10 चौकार लगावले. दिवसअखेर अंकित बावणे नाबाद 36 धावांवर खेळत आहे. त्याने 93 चेंडूंत 3 चौकार ठोकले. अनुपम संकलेचा 1 धावांवर नाबाद आहे.
यजमान आसामच्या जे. सय्यदने 24 षटकांत 85 धावा देत 3 बळी घेतले. अरूष दासने 76 धावा देत 2 गडी बाद केले.