आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी सामना: महाराष्ट्र-आंध्र लढत बरोबरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कडप्पा - रणजी स्पर्धेच्या ‘क’ गटात खेळल्या गेलेली महाराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. शेवटच्या दिवसअखेर दुसर्‍या डावात आंध्र प्रदेशने 7 बाद 237 धावा काढून सामना अनिर्णित ठेवला. या गटात महाराष्ट्र 4 सामन्यातील 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आंध्र प्रदेशचे 5 लढतीत केवळ 4 गुण असून 5 सामन्यांत 23 गुणांसह हिमाचल प्रदेश आघाडीवर आहे.
आंध्रने कालच्या 1 बाद 27 धावसंख्येवरून पुढे खेळताना अखेरच्या दिवशी 210 धावांची भर घातली. यात चतुर्वेदीने 209 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक 85 धावा काढल्या. त्याला अंकित बावणेने संग्राम अतीतकरकरवी झेल बाद केले. आंध्रप्रदेशकडून बोधापती सुमंतने 8, अमोल मुजुमदारने 14, सय्यद शहाबुद्दीनने 16 तर प्रदीपने 25 धावा काढल्या. दिवस अखेर मारीपुरी सुरेश 38 धावांवर तर हरीश 16 धावांवर नाबाद राहिला.
अनुपमचे 3 बळी
महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचाने 25 षटकांत 52 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 9 निर्धाव षटके टाकली. रणजीत पदार्पण करणार्‍या भरतकुमार सोलंकीसह अंकित बावणे आणि निकीत धुमाळने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
आंध्र प्रदेश पहिला डाव 317 धावा. महाराष्ट्र पहिला डाव 440 धावा. आंध्र प्रदेश दुसरा डाव 7 बाद 237 धावा. (चतुर्वेदी 85, सुरेश 38 धावा. अनुपम संकलेचा 52/3.)