आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji One Day Match News In Marathi, Maharashtra, Ankit

रणजी वनडे लढतीत महाराष्‍ट्राचा पराभव; अंकितचे शतक हुकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकित बावणे - Divya Marathi
अंकित बावणे

औरंगाबाद - राजकोट येथे झालेल्या रणजी वनडे लढतीत बडोद्याने महाराष्‍ट्रावर 50 धावांनी विजय मिळवला. केदार देवधरच्या शतकाच्या बळावर बडोद्याने 9 बाद 334 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात महाराष्‍ट्राचा डाव 284 धावांत संपुष्टात आला. युवा फलंदाज अंकित बावणेचे (97) शतक थोडक्यात हुकले.


प्रथम फलंदाजी करणा-या बडोद्यातर्फे सलामीवीर केदार देवधरने 103 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 103 धावा ठोकल्या. आदित्य वाघमोडे (88) आणि अनुभवी फलंदाज युसूफ पठाणने (66) शानदार अर्धशतके झळकावत संघाला भक्कम स्थितीत आणून ठेवले. महाराष्‍ट्राच्या श्रीकांत मुंढेने 55 धावा देत 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात महाराष्‍ट्रातर्फे सलामीवीर रोहित मोटवाणीने 31 धावा काढल्या. युवा खेळाडू अंकित बावणेने जबाबदारीने खेळ करत 97 धावा केल्या. त्याचे केवळ 3 धावांनी शतक हुकले. त्याने 122 चेंडंूत 5 चौकार लगावले. त्यानंतर आलेल्या निखिल नाईकने एकाकी झुंज देत 61 चेंडूत 78 धावा जोडल्या. इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने संघाचा 50 धावांनी पराभव झाला. लुकमन मेरीवालाने 3 व इरफान पठाणने 2 गडी बाद केले.