आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ankit Bawne Hit Tons On A Good Last Day For Maharashtra Against Gujarat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणजी ट्रॉफी : महाराष्ट्र विरुद्ध गुजरात लढत बरोबरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वालसाद (गुजरात) - फॉलोऑननंतर सूर गवसलेल्या महाराष्ट्राच्या चिराग खुराणा, अंकित बावणेने नाबाद शतके आणि स्वप्निल गुगळे व हर्षद खडीवालेने अर्धशतके झळकावली. अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने ३ बाद ४२९ धावा उभारत सामना बरोबरीत राखला. मात्र पहिल्या डावात आघाडी मिळवलेल्या गुजरातला ४ गुण देण्यात आले. महाराष्ट्राला एका गुणावर समाधान मानावे लागले.
गुजरातने पहिल्या डावात सर्वबाद ४२९ तर महाराष्ट्राने सर्वबाद २६२ धावा काढल्या. फॉलोऑननंतर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी लय मिळवली. कालच्या बिनबाद १३१ धावांच्या पुढे खेळताना महाराष्ट्राची नाबाद सलामीवीर जोडी १४३ धावांची भागीदारी करून फुटली. स्वप्निल गुगळे ८८ आणि हर्षद खडीवाले ७७ धावा काढून बाद झाले.

केदार जाधव (२५) पुन्हा एकदा अपयशी ठरला. फलंदाजीत बढती मिळालेल्या अष्टपैलू चिराग खुराणाने नाबाद १३० आणि पाचव्या क्रमांकावर आलेल्या अंकित बावणेने नाबाद शतक ठोकत धावसंख्येला उभारी दिली. चिरागने २१८ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार लगावले. अंकितने १७४ चेंडूंचा सामना करताना १० चौकार खेचत नाबाद १०० धावांची खेळी केली.

गोलंदाज अपयशी
महाराष्ट्राच्या दुसर्‍या डावात गुजरात संघाच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. सामन्यात विकेट घेण्यासाठी त्यांना झगडावे लागले. पहिल्या डावात ४ बळी घेणार्‍या रमेश पोवारला एकच बळी घेता आला. मेहूल चौधरी व हार्दिक पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

केरळचा पहिला विजय
कन्नुर - अक्षय चंद्रनच्या (६/३९) धारदार गोलंदाजीच्या बळावर केरळ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. या संघाने सैन्य दलाचा पराभव केला. केरळ संघाने नऊ गड्यांनी सामना जिंकला. फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जाणार्‍या सैन्य दलाने दुसर्‍या डावातही १७४ धावांत गाशा गुंडाळला. त्यानंतर विजयाचे लक्ष्य केरळने गाठले.

मुंबईकडून बडोद्याचा पराभव
वडोदरा - तब्बल ४० वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाने रविवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली. या संघाने अ गटातील आपल्या सामन्यात यजमान बडोदा संघाचा पराभव केला. मुंबई संघाने १६९ धावांनी सामना आपल्या नावे केला.