आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy: Ankit Played Half Century; Maharashtra Energetic Start

रणजी करंडक: अंकितचे अर्धशतक; महाराष्ट्राची दमदार सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- रणजी ट्रॉफी स्पर्धेत हर्षद खडीवाले, रोहित मोटवाणी आणि अंकित बावणेच्या अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने सौराष्ट्राविरुद्ध पहिल्या दिवशी दमदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ बाद ३२० धावा केल्या.
सलामीवीर स्वप्निल गुगळे (११) स्वस्तात बाद झाला. सलामीवीर हर्षद खडीवालेने ९१ चेंडूंत ६७ धावा केल्या. रोहित मोटवाणीने १५४ चेंडूंत ७ चौकार लगावत ७० धावा काढल्या. त्याला कमलेश माकवानाने सागरकरवी झेलबाद केले. भारताच्या संभाव्य ३० जणांच्या संघात निवड झालेल्या केदार जाधवने ४९ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला. संघाचा कणा समजला जाणारा अंकित बावणे अर्धशतक झळकावत मैदानावर खेळत आहे. त्याने ७४ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ५२ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र ९० षटकांत ३२० धावा. (हर्षद खडीवाले ६७, रोहित मोटवाणी ७०, अंकित बावणे ५२* धावा. कमलेश मकवाना ३/७३).

सूर्यकुमार तळपला; शानदार शतक ठोकले
मुंबई-कर्णधार सूर्यकुमार यादवचे शतक (१३५) आणि अखिल हेरवाडकरचे हुकलेले शतक (९७) याच्या बळावर यजमान मुंबईने मध्य प्रदेशविरुद्ध आजपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या रणजी सामन्यात दिवसअखेर ४ बाद ३७५ अशी दमदार सलामी दिली. खेळ थांबला तेव्हा सिद्धेश लाड ६९ धावांवर आणि सर्फराज खान २० धावांवर खेळत होते. त्याआधी मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई मध्य प्रदेशविरुद्ध ४ बाद ३७५