आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy: Gautam Gambhir, Virendra Sehwag Completed Half Century

रणजी ट्रॉफी: गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवागची अर्धशतके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रणजी ट्रॉफीत गुरुवारी दिल्लीने महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावात दुस-या दिवसअखेर ७६ षटकांत ४ बाद २४० धावा केल्या. महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद ३३० धावा केल्या. चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी आहे, त्यांच्या सहा विकेट शिल्लक आहेत.

दिल्लीचा उन्मुक्त चंद केवळ एक धाव काढून बाद झाला. गौतम गंभीरने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याला शतक पूर्ण करायला अवघ्या ७ धावांची आवश्यकता आहे. त्याने २१७ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ९३ धावा केल्या. वीरेंद्र सेहवागने ६६ धावा काढल्या.

चौघांच्या १८ धावा
कालच्या ६ बाद ३१२ धावांच्या पुढे खेळताना महाराष्ट्र संघाच्या चार फलंदाजांनी सपशेल निराशा केली. त्यांना संघाच्या धावसंख्येत केवळ १८ धावांची भर घालू शकले. नाबाद अर्धशतकी खेळी करणारा चिराग खुराणा (५५) एकही धाव न काढता बाद झाला. त्यापाठोपाठ श्रीकांत मुंढेने ३२ धावा जोडल्या. गोलंदाजीत दिल्लीच्या सुमीत नरलवाने ३७ धावांत ३ आणि परविंदर अवनाने ६० धावांत २ गडी बाद केले.