आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राची दमदार सुरुवात, पंजाबविरुद्ध पहिल्या डावात २१० धावा; त्रिपाठीचे अर्धशतक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात पंजाबविरुद्ध दमदार सुरुवात केली. महाराष्ट्राने पहिल्या डावात शानदार कामगिरीसह २१० धावा काढल्या. प्रत्युत्तरात हरभजनसिंगच्या पंजाब संघाची निराशाजनक सुरुवात झाली. पंजाबने पहिल्या दिवसअखेर १ बाद २६ धावा काढल्या. दिवसअखेर जीवनज्याेतसिंग (१६) आणि अमिताेझसिंग (८) हे दोघे मैदानावर खेळत आहेत. सलामीवीर उदय काैल (१) झटपट बाद होऊन तंबूत परतला. गाेलंदाजीत महाराष्ट्राच्या समद फल्लाहने शानदार एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकून पंजाबच्या हरभजनसिंगने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या राेहित मोटवाणीच्या महाराष्ट्र संघाची निराशाजनक सुरुवात झाली. चिराग खुराणा (८) आणि सलामीवीर खडीवाले (१४) झटपट बाद झाले. त्यानंतर केदार जाधव (१५) आणि जालन्याचा युवा खेळाडू विजय झाेल (१६) यांनी संघाचा डाव सावरला. झाेलने २४ चेंडूंचा सामना करताना तीन चाैकारांसह १६ धावांची खेळी केली. दुसरीकडे केदारने १५ धावा काढून तंबू गाठला.
उदय, हरभजनसिंगने केली धारदार गाेलंदाजी
महाराष्ट्रविरुद्ध सामन्यातील गाेलंदाजीत पंजाबकडून उदय काैल आणि कर्णधार हरभजनसिंगने चमकदार कामगिरी केली. उदयने २२ षटकांत ४६ धावा देत तीन गडी बाद केले. यात त्याने पाच निर्धाव षटके टाकली. तसेच हरभजन, संदीप शर्मा, मनिंदरसिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. युवराजने एक विकेट घेतली.
अंकितची शानदार खेळी
आैरंगाबादचा युवा खेळाडू अंकित बावणे आणि राहुल ित्रपाठी यांनी संघाची पडझड थांबवली.या दोघांनीही संयमी खेळी करताना महाराष्ट्राच्या धावसंख्येला गती दिली. यात अंकित बावणेने १०९ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली. यात पाच चाैकारांचा समावेश आहे. तसेच त्रिपाठीने ११० चेंडूंचा सामना करताना नऊ चाैकारांच्या आधारे शानदार ५६ धावा काढल्या. श्रीकांत मुंढेने नाबाद ३० धावांचे याेगदान दिले.
हरियाणाविरुद्ध विदर्भाच्या
३ बाद १०१ धावा
राेहतकच्या मैदानावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब गटात विदर्भ संघाने हरियाणाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर तीन बाद १०१ धावा काढल्या. फैज फजल (४२) आणि शलभ श्रीवास्तव (१०) मैदानावर खेळत आहेत. कर्णधार एस. बद्रीनाथ २० धावा काढून तंबूत परतला. तसेच सलामीवीर आर. संजयला भाेपळाही फाेडता आला नाही.
शार्दूलचा एक बळी
मुंबईच्या शार्दूल ठाकूरने अ गटात उत्तर प्रदेशविरुद्ध सामन्यात शानदार एक विकेट घेतली. यासह त्याने मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे उत्तर प्रदेश संघाला कानपूरच्या मैदानावर पहिल्या दिवसअखेर एक बाद ११५ धावा काढता आल्या. तन्मय श्रीवास्तव ४९ आणि प्रशांत गुप्ता ४१ धावांवर खेळत आहेत. सलामीवीर मुकुल डगर १५ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.