आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी करंडक: महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र आणि ४० वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाने सोमवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यजमान मुंबई संघाचा घरच्या मैदानावर कर्नाटकविरुद्ध सामना अनिर्णीत राहिला. रोहित मोटवाणीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने सामन्यात विदर्भावर सहा गड्यांनी मात केली. यात पहिल्या डावातील शतकवीर औरंगाबादचा युवा खेळाडू अंकित बावणे सामनावीराचा मानकरी ठरला. हर्षद खडीवाले (४२), केदार जाधव (२८), मोटवाणी (२७), राहुल त्रिपाठी (नाबाद ३९) अाणि अंकित बावणेच्या नाबाद ८ धावांच्या बळावर महाराष्ट्राने सामना जिंकला. या संघाने आवाक्यातले १६४ धावांचे लक्ष्य ३०.५ षटकांत गाठले. महाराष्ट्राकडून समद फल्लाहने दुस-या डावात एकूण चार आणि डोमिनिक जोसेफने ३ बळी घेतले. त्यामुळे ३९१ धावांत विदर्भाचा दुसरा डाव गुंडाळला. त्यामुळे या संघाला महाराष्ट्रासमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवता आले.

तामिळनाडू अंतिम आठमध्ये : तामिळनाडू संघाने सोमवारी स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये धडक मारली. या संघाने अ गटात बडोद्यावर सात गड्यांनी मात केली. मुरली विजयच्या (१०४) शतकाच्या बळावर तामिळनाडू संघाने सामना जिंकला. बडोद्या संघाने दिलेल्या २०७ धावांच्या प्रत्युत्तरात तामिळनाडूने दुस-या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

मुंबई-कर्नाटक लढत ड्रॉ
अ गटात झालेला यजमान मुंबई व कर्नाटक यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या डावात ४३६ धावा काढणा-या मुंबईने दुसरा डाव २२३ धावांत घाेषित केला हाेता. दुस-या डावात २४५ धावांच्या प्रत्युत्तरात कर्नाटकने एका गड्यांच्या मोबदल्यात ११० धावा काढून सामना अनिर्णीत ठेवला. रॉबिन उथप्पा नाबाद ४४, के. कपूरने नाबाद ५० धावांची खेळी केली.