आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy: Maharashtra In Commanding Position

रणजी ट्रॉफी : अंकित बावणेचे शानदार शतक; विदर्भाची हाराकिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंकित बावणेच्या नाबाद शतकाने महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा उभारल्या. विदर्भाचा पहिला डाव ११४ धावांत आटोपला. दुसर्‍या दिवसअखेर विदर्भाने फॉलोऑननंतर दुसर्‍या डावात बिनबाद २६ धावा केल्या.

कालच्या ४ बाद २६२ धावांपुढे खेळताना महाराष्ट्राने तीनशेचा टप्पा पार केला. कालचा नाबाद राहुल त्रिपाठी ५ धावांची भर घालू शकला. राहुल चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याला वाखरेने ४३ धावांवर धावबाद केले. अंकित बावणेने शानदार नाबाद शतक ठोकले. त्याने २२१ चेंडूचा सामना करताना १३ चौकार आणि एक षकार लगावत १०० धावा झळकावल्या. श्रीकांत मुंढेने १३ आणि समद फल्लाहने १० धावा जोडल्या. विदर्भाकडून रवीकुमार ठाकूरने ९४ धावांत ३ गडी बाद केले. श्रीकांत वाघ आणि स्वप्निल बंडीवार यांनी प्रत्येकी २ गडी टिपले.

विदर्भाचा डाव कोसळला
महाराष्ट्राच्या डी. जोसेफ (५) आणि श्रीकांत मुंढेच्या (३) भेदक गोलंदाजपुढे पहिल्या डावात विदर्भाचा डाव ४८.५ षटकांत सर्वबाद ११४ धावांवर कोसळला. कर्णधार एस. बद्रीनाथच्या २७ आणि फैज फजलच्या २६ धावा वगळता इतरांनी निराशा केली. फॉलोऑननंतर विदर्भाने १३ षटकांत बिनबाद २६ धावा केल्या. फैज फैजल नाबाद १४ व सचिन कटारीया नाबाद १२ धावांवर खेळत आहेत.