आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy : Maharashtra Made First Inning 455 Runs

रणजी ट्रॉफी : महारष्‍ट्राच्या पहिल्या डावात 455 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - संग्राम अतीतकर (168) आणि अंकित बावणेच्या (89) दमदार खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगालविरुद्ध पहिल्या डावात 455 धावांचा डोंगर उभा केला. बंगालने पहिल्या डावात अवघ्या 114 धावा काढल्याने महाराष्‍ट्राला तब्बल 341 धावांची भक्कम आघाडी घेतली. औरंगाबादच्या अंकित बावणेचे शतक थोडक्यात हुकले.


याशिवाय अनुपम संकलेचाने (52) अर्धशतक झळकावले. महाराष्‍ट्राने 455 धावा केल्या. दिवसअखेर बंगालने दुस-या डावात 1 बाद 16 धावा केल्या होत्या.


कालच्या 4 बाद 164 धावांच्या पुढे खेळताना दुस-या दिवशी फलंदाजांनी 291 धावा जोडल्या. युवा फलंदाज अंकित बावणेने कालच्या नाबाद 37 धावांच्या पुढे खेळताना अर्धशतक झळकावले. त्याने 208 चेंडंूचा सामना करताना 14 चौकार आणि 1 षटकार खेचत 89 धावा काढल्या. कर्णधार रोहित मोटवाणी (8) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेल्या संग्राम अतीतकरने धमाकेदार दीड शतक ठोकत संघाला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. त्याने 228 चेंडूत तब्बल 29 चौकार लगावत 168 धावा काढल्या. तळातील फलंदाज अनुपम संकलेचाने (52) अर्धशतक झळकावले. दुस-या डावात बंगालने 1 बाद 16 धावा काढल्या. के. घोषने 9 धावा काढल्या.


अंकित-संग्रामची मजबूत शतकी भागीदारी
औरंगाबादचा युवा फलंदाज अंकित बावणे (89) आणि संग्राम अतीतकर (168) या जोडीने 113 धावांची उपयुक्त शतकी भागीदारी केली. संग्रामने प्रथम श्रेणीतील आपले चौथे शतक झळकावले. अंकित बावणेने आपले सलग दुसरे अर्धशतक ठोकले. त्याचे हे प्रथम श्रेणीतील 13 वे अर्धशतक आहे.


संक्षिप्त धावफलक
(बंगाल पहिला डाव- 114. महाराष्‍ट्र-455. संग्राम अतीतकर 168, अंकित बावणे 89 धावा, लक्ष्मीरतन शुक्ला 3/76. दुसरा डाव बंगाल- के. घोष 9 धावा, समद फल्लाह 1/7)