Home | Sports | Football | Ranji Trophy: Maharashtra opportunity to win today

रणजी ट्रॉफी: महाराष्ट्राला आज सौराष्ट्राविरुद्ध विजयाची संधी

वृत्तसंस्था | Update - Jan 08, 2015, 04:00 AM IST

रणजी ट्रॉफी: महाराष्ट्राला आज सौराष्ट्राविरुद्ध विजयाची संधी

 • Ranji Trophy: Maharashtra opportunity to win today
  राजकोट - रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला सौराष्ट्राविरुद्ध विजयाची संधी आहे. महाराष्ट्राने अंकित बावणेच्या शतकाच्या बळावर पहिल्या डावात ५१९ धावा केल्या. सौराष्ट्राचा पहिला डाव सर्वबाद २७३ धावांत संपुष्टात आल्याने फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात सौराष्ट्राने तसिऱ्या दिवसअखेर ४ गडी गमावत ५३ धावा केल्या. सौराष्ट्र आणखी १९३ धावांनी मागे असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक आहेत.

  कालच्या ३ बाद ९४ धावांपुढे खेळताना पहिल्या डावात सौराष्ट्राच्या एसपी जॅक्सनने शतक झळकावले. अर्धशतकानंतर तसिऱ्या दिवशीही लय कायम ठेवत जॅक्सनने १०२ धावा केल्या. त्याने १२३ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ४ चौकार खेचले. त्याला राहुल त्रिपाठीने अक्षय दरेकरकरवी झेलबाद करून अडथळा दूर केला.

  कर्णधार जे. एन. शहाने अवघी एक धावा काढली. डी. एम. चौहान भोपळाही फोडू शकला नाही. तळातील फलंदाज मकवानाने १०७ चेंडूंत ४ चौकार लगावत ३० आणि सानंदियाने १२१ चेंडूंत ६ चाैकारांच्या मदतीने ४० धावा केल्या.

  डी. जडेजाने नाबाद १९ आणि एस. त्यागीने १४ धावा जोडल्या. सौराष्ट्र पहिल्या डावात २४६ धावा मागे राहिला. महाराष्ट्राच्या चिराग खुराणाने ७० धावा देत ५ गडी बाद केले. अक्षय दरेकरने ८९ धावांत ३ विकेट घेतल्या.

  दुसऱ्या डावातही सौराष्ट्राची पिछाडी
  फॉलोऑननंतर सौराष्ट्राचा तसिऱ्या दिवसअखेर ४ बाद ५३ धावांवर डाव घसरला. सलामीवीर बी. एम. चौहानने २१, एस. डी. जोगियानीने १८ धावा काढल्या. कर्णधार जे. एन. शहा (७) पुन्हा फ्लॉप ठरला. त्याला अक्षय दरेकरने संग्राम अतितकरकरवी झेलबाद केले. सानंदिया भोपळाही फोडू शकला नाही. व्ही. जोशी नाबाद २ धावांवर खेळत आहे. महाराष्ट्राच्या अक्षय दरेकरने, २ तर चिराग खुराणाने १ गडी बाद केला.

Trending