आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy: Second Day Maharashtra Failed Before Karnatka

रणजी करंडक : दुस-या दिवशाच्या लढतीत महाराष्‍ट्राचे गोलंदाज कर्नाटकसमोर अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - रणजी ट्रॉफीच्या अंतिम लढतीत दुस-या दिवशी गुरुवारी महाराष्‍ट्राचे गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर गणेश सतीशच्या (117) नाबाद शतकाच्या बळावर कर्नाटकने बिनबाद 230 धावा करत सामन्यावर पकड मिळवली. राहुलने (94) नाबाद अर्धशतक झळकावले. महाराष्‍ट्र संघाचा पहिला डाव 305 धावांवर आटोपला.


महाराष्‍ट्राच्या फलंदाजांनी कालच्या 5 बाद 272 धावांपुढे खेळताना पाच गडी केवळ 32 धावांची भर घालू शकले. दुस-या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा संग्राम अतीतकरने विनयकुमारचे पहिले षटक खेळून काढले. दुस-या षटकात अभिमन्यू मिथुनने पहिल्या चेंडूवर महाराष्‍ट्राच्या डावाला आकार देणा-या अंकित बावणेचा (89) त्रिफळा उडवला. त्याची शतक ठोकण्याची संधी धुळीस मिळाली. औरंगाबादचा युवा खेळाडू अंकित बावणे बाद झाल्यानंतर केवळ 32 धावांच्या अंतरात संघाने 5 फलंदाज गमावले. यादरम्यान संग्राम अतीतकरने अर्धशतक ठोकले. त्याने 97 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा काढल्या. त्याला गौतमकरवी झेलबाद केले. त्यानंतर तळातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.


तिघांचे प्रत्येकी तीन बळी
कर्नाटकच्या विनयकुमार, अभिमन्यू मिथुन, श्रीनाथ अरविंदने प्रत्येकी 3 बळी घेतले. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनयने 30.1 षटकांत 81 धावा दिल्या आणि अभिमन्यू मिथुनने 23 षटकांत 49 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाज तंबूत पाठवले.


सतीशच्या नाबाद 117 धावा
कर्नाटकने दुस-या दिवसअखेर बिनबाद 230 धावा काढल्या. संघ आणखी 75 धावांच्या पिछाडीवर आहे. सलामीवीर आर. उथप्पा 10 धावांवर रिटायर झाला. सलामीवीर के . एल. राहुलने नाबाद 94 आणि गणेश सतीशने नाबाद 117 धावांची खेळी करत संघाची सामन्यावर पकड निर्माण केली आहे.


धावफलक
महाराष्‍ट्र धावा चेंडू 4 6
खडीवाले पायचीत गो. विनयकुमार 15 29 3 0
खुराणा पायचीत गो. नायर 64 145 8 0
झोल झे. गौतम गो. अरविंद 05 28 0 0
जाधव झे. गौतम गो. मिथुन 37 44 6 0
अंकित बावणे त्रि. गो. मिथुन 89 173 10 0
मोटवाणी झे. गौतम गो. मिथुन 17 61 2 0
अतीतकर झे. गौतम गो. अरविंद 50 97 8 0
मुंढे झे. पांडे गो. अरविंद 07 32 1 0
दरेकर झे. अरविंद गो. विनयकुमार 02 12 0 0
संकलेचा पायचीत गो. विनयकुमार 01 06 0 0
समद फल्लाह नाबाद 02 03 0 0
अवांतर : 16. एकूण : 104.1 षटकांत सर्वबाद 305 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-24, 2-42, 3-90, 4-144, 5-215, 6-272, 7-294, 8-301, 9-302, 10-305. गोलंदाजी : विनयकुमार 30-6-81-3, अभिमन्यू मिथुन 23-8-49-3, श्रीनाथ अरविंद 26-6-65-3, मनीष पांडे 1-0-2-0, श्रेयस गोपाल 13-0-54-0, करून नायर 5-1-21-1, अमित वर्मा 4-0-14-0, गणेश सतीश 2-0-8-0.
कर्नाटक धावा चेंडू 4 6
रॉबिन उथप्पा रिटायर्ड 10 14 2 0
के. आर. राहुल नाबाद 94 189 9 1
गणेश सतीश नाबाद 117 207 16 0
अवांतर : 9. एकूण : 68 षटकांत बिनबाद 230 धावा. गोलंदाजी : समद फल्लाह 16-2-40-0, अनुपम संकलेचा 15-3-40-0, अक्षय दरेकर 9.5-0-49-0, श्रीकांत मुंढे 12-2-43-0, चिराग खुराणा 10.1-0-35-0, संग्राम अतीतकर 5-0-18-0.