आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranji Trophy: Shriknat Mundhe Complete Century, Draw Maharashtra Delhi Match

रणजी ट्रॉफी : श्रीकांत मुंढेचे झुंजार शतक, महाराष्ट्र-दिल्ली लढत बरोबरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शनिवारी चौथ्या दिवशी महाराष्ट्राने रणजी ट्रॉफीत बलाढ्य दिल्लीला बरोबरीत रोखत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३ गुणांची कमाईदेखील केली. अष्टपैलू श्रीकांत मुंढेचे शतक महाराष्ट्राच्या दुस-या डावाचे वैशिष्ट्य ठरले. महाराष्ट्राने पहिल्या डावात ३३० तर दिल्लीने ३०७ धावा काढल्या. महाराष्ट्राने दुस-या डावात ३६६ धावा तर अखेरच्या दिवस अखेर दिल्लीने ३ बाद ७८ धावा केल्या.

महाराष्ट्राने कालच्या ५ बाद १८७ धावांच्या पुढे खेळताना ३६६ धावा उभारल्या. राहुल त्रिपाठीने ६६, चिराग खुराणाने ८०, श्रीकांत मुंढेने ११९ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकार खेचत १०४ धावा केल्या. दिल्लीकडून परविंदर अवनाने ४ गडी बाद केले. दुस-या डावात दिल्लीने ३ बाद ७८ धावा केल्या.