आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे सर्वात लकी मॅनेजर बनले आयपीएलचे नवीन कमिशनर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नईमध्‍ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्‍या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत एन श्रीनिवासन यांची बिनविरोध अध्‍यक्षपदी निवड झाली. ही निवड अपेक्षेप्रमाणेच होती. याच बैठकीत स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर राजीव शुक्‍ला यांनी राजीनामा दिल्‍यानंतर रिक्‍त झालेल्‍या आयपीएल चेअरमनपदी रंजीब बिस्‍वाल यांची निवड झाली आहे.

श्रीनिवासन हे पुन्‍हा एकदा अध्‍यक्ष बनणार हे निश्चित होते. परंतु, सर्वांच्‍या नजरा टिकून होत्‍या त्‍या आयपीएल चेअरमनपदावर. विशेष म्‍हणजे सर्वात जास्‍त चर्चा झाली ती या पदावरच. चर्चेचा फे-या झडल्‍यानंतर ही जबाबदारी ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे प्रमूख रंजीब बिस्‍वाल यांच्‍यावर सोपवण्‍यात आली.

रंजीब हे स्‍वत: चांगले खेळाडू होते. त्‍याचबरोबर ते टीम इंडियाचे आतापर्यंतचे सर्वात लकी मॅनेजर सिद्ध झाले होते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या नव्‍या आयपीएल चेअरमनच्‍या स्‍पोर्ट्स आणि पर्सनल लाईफबाबत तसेच ते कसे ठरले टीम इंडियाचे सर्वात लकी मॅनेजर...