आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rasool Named In Squad, Dhoni And Other Key Players Rested

झिम्‍बाब्वे दौ-यासाठी धोनीला विश्रांती, विराटकडे कर्णधारपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झिम्‍बाब्‍वे दौ-यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्‍या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड करण्‍यात आली आहे. निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली. जम्‍मू आणि काश्मिरचा फिरकीपटू परवेझ रसूल याचाही संघात समावेश करण्‍यात आला आहे. वेस्‍ट इंडिज दौ-या जायबंदी झाल्‍यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्‍यात आली आहे. मुरली विजयला वगळण्‍यात आले आहे. तर गौतम गंभीरचा विचार करण्‍यात आला नाही.

निवड समितीने झिम्‍बाब्‍वे दौ-यासाठी आणखी काही खेळाडुंना विश्रांती दिली आहे. इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार, आर. अश्विन यांना विश्रांती देण्‍याचा निर्णय निवड समितीने घेतला.

हरियाणाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यालाही संघात स्‍थान देण्‍यात आले आहे. मोहित शर्मा आयपीएलमध्‍ये चेन्‍नई सुपर किंग्‍सकडून खेळला होता. तर सौराष्‍ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटलाही संधी देण्‍यात आली आहे.

भारतीय संघ झिंबाब्‍वे दौ-यात 5 एक दिवसीय सामन्‍यांची मालिका खेळणार आहे. हरारे आणि बुलावायो येथे 24 जुलै ते 3 ऑगस्‍ट या कालावधीत ही मालिका होणार आहे.

संघ- विराट कोहली (कर्णधार), चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, जयदेव उनाडकट, मोहित शर्मा, परवेझ रसूल, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, अंबाती रायुडू, अमित मिश्रा, मोहम्‍मद शमी, विनय कुमार, शिखर धवन, रोहित शर्मा